सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला तथाकथित महंत, बुवा-बाबांना बोलावून अनिष्ठ पायंडा पाडला आहे. याचा सातारा येथे झालेल्या परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी किशोर बेडकिहाळ होते. निषेधाचा ठराव दिनकर झिंब्रे यांनी मांडला. विजय मांडके यांनी अनुमोदन दिले. कॉ. वसंत नलावडे, अविनाश जगताप, जयंत उथळे, मिनाज सय्यद, एस. एस. पाटील, विजय निंबाळकर, आर. वाय. जाधव, दत्ता राऊत, उमेश खंडजोडे, उदय चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शपथविधीला बुवाबाबांना बोलाविल्याचा निषेध
By admin | Updated: November 4, 2014 00:23 IST