शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फायद्याची शेती, क्विंटलला एक लाख रुपये भाव; जामखेडच्या तरुणाचा दुष्काळी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 06:38 IST

कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवात जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया हे पीक चांगलेच भाव खात आहे.

प्रशांत ननवरेबारामती :

कृषी विकास प्रतिष्ठानच्या धान्य महोत्सवात जामखेडच्या एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेले चिया हे पीक चांगलेच भाव खात आहे. एक लाख रूपये क्विंटल दराने असणारे हे औषधी पीक महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. दुष्काळी भागासाठी ते वरदान आहे. चिया बियाणे या पिकाला सुपरफूड मानले जाते.  हे पीक मूळचे मध्य आणि दक्षिण मेक्सिको व ग्वाटेमाला येथील आहे. महेंद्र अजीनाथ बारस्कर (रा. वाघा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे या ३९ वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. बारस्कर यांचे शिक्षण दहावी नापास आहे. त्यांनी लावलेल्या पिकाने भल्याभल्यांना अचंबित केले आहे. भारतात उच्चांकी दर मिळणाऱ्या या पीक लागवडीचा त्यांनी प्रयोग यशस्वी केला आहे. हे खरीप हंगामात येणारे पीक आहे. १५ ते ३० नोव्हेंबरदरम्यान पिकाची लागवड केली जाते. रक्तदाब, वजन कमी करणे, मधुमेह, हाडे मजबूत आदी आरोग्यदायी जीवनासाठी चियाचा उपयोग होतो. लागवडीपासून १२० दिवसांत हे पीक तोडणीसाठी तयार होते. तुळशीला येणाऱ्या मंजिरीप्रमाणे हे पीक आहे. लागवडीसाठी हलकी, भारी कोणतीही जमीन उपयुक्त आहे. कमी पाण्यात अगदी एक महिना हे पीक पाण्याशिवाय उभे राहते. 

या पिकाची एकरी पाच क्विंटल उत्पादन क्षमता आहे. मात्र, बारस्कर यांनी सेंद्रिय आणि शेणखताच्या वापरामुळे एकरी १० क्विंटल उत्पादन काढले आहे. 

उग्र वासामुळे जनावरेदेखील या पिकाला तोंड लावत नाहीत. या पिकाला कोणत्याही रासायनिक खताची अथवा फवारणीची गरज नाही. हे पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. रात्री २ ते ३ ग्रॅम चिया पाण्यात भिजवून सकाळी हे खाल्ल्यास याचा फायदा होतो.     - महेंद्र बारस्कर, जामखेड