शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

उसाच्या पट्ट्यात दिला पपई लागवडीने नफा

By admin | Updated: August 22, 2016 01:03 IST

काटेवाडी परिसर खरे तर ऊस बागायतदारांचा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो

गजानन हगवणे,

काटेवाडी- काटेवाडी परिसर खरे तर ऊस बागायतदारांचा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र, येथील युवा शेतकऱ्याने उसाच्या पट्ट्यात पपई लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. ऊसपिक नफ्याहून अधिक नफा मिळविल्याने येथील पपई लागवडीचा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे.येथील युवा शेतकरी प्रकाश काशिनाथ टेंगले यांनी ऊसपिकास फाटा देत एक एकर क्षेत्रावर पपई पिकाची लागवड केली आहे. या पिकातून खर्च वजा जाता चार ते साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यांच्या या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. पाणीटंचाई निर्माण झाली असतानाही ठिबक सिंचन करून टेंगले यांनी मे महिन्यात एक एकर क्षेत्रात पपई लागवडीचे नियोजन केले. सुरुवातीला शेणखत टाकून शेत तयार केले. सात बाय आठ या अंतरावर पपईच्या झाडांची लागवड केली. पाण्याची भीषण टंचाई त्यामुळे ठिबक सिंचन केले. टेंगले ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तरीही ते शेतीवर लक्ष केंद्रित करतात. याकामी त्यांच्या कुटुंबाचे सामूहिक योगदान महत्त्वपूर्ण ठरले. एकत्रित कुटुंबामुळे शेतातील कामांचे परिपूर्ण नियोजन करणे शक्य झाले. पपईमध्ये त्यांनी आतंरपिक म्हणून सुरुवातीस झेंडूपिकाचे उत्पन्न घेतले. यावर लागवडीसह मशागतीचा खर्च निघाला. नियोजनामुळे रमजानच्या सणात पपईचे उत्पन्न सुरू झाले. बाजारभाव सरासरी दोनशे तीस रुपये मिळाला. आतापर्यंत दहा ते बारा टनापर्यंत माल निघाला आहे. >पपईला पंधरा ते वीस रुपये भाव मिळत आहे. जवळपास पाच ते साडेपाच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मशागत लागवडीचा खर्च झेंडूच्या आतंरपिकातून यापूर्वीच वसूल केला आहे. फळेतोडणी, प्रतवारी करणे, फळास कागदी पेपरात आवरण आदी कामासाठी कुटुंबातील सदस्यच मदत करतात. त्यामुळे खर्चात बचत होते. वडिलांसह कुटुंबाचा सामूहिक सहभाग, प्रोत्साहन यामुळे पपई लागवड प्रयोग फायद्याचा ठरला. त्यामुळे ऊसपिकास फाटा देऊन चांगले उत्पादन मिळाल्याचे आवर्जून टेंगले सांगतात.