शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

व्यावसायिक प्रकल्पबाधितांना भरपाई मिळणार

By admin | Updated: July 12, 2017 02:03 IST

रस्ते व नाले रुंदीकरण, तानसा पाइपलाइनवरील झोपड्या अशा प्रकल्पांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या झोपड्या हटविण्यात येतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रस्ते व नाले रुंदीकरण, तानसा पाइपलाइनवरील झोपड्या अशा प्रकल्पांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या झोपड्या हटविण्यात येतात. मात्र या प्रकल्पात बाधित रहिवाशांना माहुल येथे पाठवण्यात येते. तर दुकानांचे गाळे गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी व्यावसायिक गाळे उपलबध होत नाहीत. त्यामुळे व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांना सध्याच्या रेडीरेकनरनुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, असा प्रस्ताव पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. नागरी व पायाभूत सुविधा देण्याच्या प्रकल्पात बेघर झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येते. घरांच्या बदली घर देण्यासाठी १६ हजार घरे पालिकेकडे आहेत. तसेच बाजार विभागाने दोन लाख ८८ लाख ८८७ चौरस फूट जागेचे व्यावसायिक प्रकल्पबाधितांना वाटप केले असून, ८६७० चौरस फूट क्षेत्रफळ शिल्लक आहे. मात्र व्यावसायिक प्रकल्पबाधित व्यक्तींची संख्या १५७४ इतकी आहे. त्यासाठी अंदाजे दोन लाख ८३ हजार ३२० चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाच्या जागेची आवश्यकता आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी तीनशे व तानसा जलवाहिनीसाठी १०९४ प्रकल्पबाधित आहेत. भविष्यात व्यावसायिक जागांच्या वितरणातील तूट वाढत गेल्यास प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे पालिकेला कठीण होणार आहे. त्यामुळे अखेर व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांना सध्याच्या रेडीरेकनरनुसार नुकसानभरपाई देण्यात यावी, असा प्रस्ताव पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत सादर करून मंजूर करण्यात आला आहे. व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांना दिलासारहिवाशांना आर्थिक नुकसानभरपाई दिल्यास प्रकल्पग्रस्तांना माहुलला पाठवण्याची गरज भासणार नाही. प्रकल्पग्रस्त मिळालेल्या आर्थिक नुकसानभरपाईमधून त्यांच्या इच्छेनुसार घरे घेऊ शकतात, असे मत विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी व्यक्त केले.