शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात कोमेजलेला गुलाब ‘व्हॅलेंटाइन’ला बहरणार; निर्यातीला सुरुवात, उत्पादनही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 06:49 IST

निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुलाबाची बाजारपेठ सध्या रुक्ष व कोरडी आहे. देशी गुलाबाची काडी लांबसडक नसते, त्यामुळे सुगंध असूनही त्याला परदेशात मागणी कमी असते. त्यामुळे गंध नसला तरीही भारतातून परदेशात जाणारा गुलाब परदेशी वाणाचाच आहे.

पुणे : कोरोना प्रादुर्भावामुळे कमी झालेल्या गुलाबाच्या निर्यातीला ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे पुन्हा बहार आला आहे. यंदाची मागणी कमी झालेली असली तरी ती सुरू झाली याचाच उत्पादकांमध्ये आनंद आहे. जपान, हॉलंड, नेदरलँड याबरोबरच दुबई व युरोपातही भारतातून गुलाबाची निर्यात होत आहे.निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुलाबाची बाजारपेठ सध्या रुक्ष व कोरडी आहे. देशी गुलाबाची काडी लांबसडक नसते, त्यामुळे सुगंध असूनही त्याला परदेशात मागणी कमी असते. त्यामुळे गंध नसला तरीही भारतातून परदेशात जाणारा गुलाब परदेशी वाणाचाच आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला लाल रंगाच्या गुलाबाला सर्वाधिक मागणी आहे. त्यातही ‘ट्रेड सिक्रेट’ असे खास नाव असलेला ‘डच’ वाणाचापण भारतात उत्पादित झालेला गुलाब परदेशात सर्वाधिक खपतो आहे.कर्नाटकचे गुलाब चेन्नईतून, तर महाराष्ट्रातील गुलाब मुंबईतून परदेशी जातात. कोरोना प्रादुर्भावामुळे एरवी तेजीत असलेली फुलांची एकूणच निर्यात कमी झाली होती. त्यातही गुलाबाला काहीच मागणी नव्हती. त्यामुळे बहुसंख्य उत्पादन स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून होते. मात्र, तिथेही मागणी कमीच होती. आता काही प्रमाणात विमानसेवा सुरू झाली आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ तोंडावर आल्याने गुलाबाची मागणी सुरू झाली आहे. विमानांच्या कंटेनर बुकिंगसाठी निर्यातदार कंपन्यांना नेहमीपेक्षा जास्त दर द्यावा लागतो आहे. पूर्वी एक किलोला सव्वाशे रुपये खर्च होता, आता तो थेट सव्वातीनशे रुपयांवर गेला आहे. परदेशातील भावही कमी झाले आहेत. पूर्वी एक गुलाब परदेशात पंधरा रुपयांना विकला जायचा, यंदा ही किंमत बारा रुपयांवर आल्याचे निर्यातदार सांगतात.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुलाबांची शेतीपुणे जिल्ह्यात गुलाबाची निर्यात करणाऱ्या कंपन्यांची संख्या १० ते १२ इतकी आहे. या परिसरात गुलाब शेती करणाऱ्या उत्पादकांची संख्या मात्र काही हजारांमध्ये आहे. गुलाबांच्या उत्पादनासाठी त्यातील काही जणांनी एकत्र येत पॉली हाऊस तयार केली आहेत. पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, नांदेड व अन्य काही जिल्ह्यांतही गुलाब शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातील बंगळुरू परिसर हा पॉलिहाऊसमधील फुलशेतीसाठी देशात प्रसिद्ध आहे.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे