शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

चळवळीतून साहित्याची निर्मिती

By admin | Updated: January 19, 2016 01:39 IST

चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे

प्रज्ञा केळकर-सिंग, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)चळवळी याच साहित्यनिर्मितीचा आधार असतात. पण, या दोन्ही वाटा आता वेगवेगळ्या दिशेने चालल्या आहेत. सर्वांना मिळुन जातीविहीन समाज निर्माण करायचा आहे. त्यामुळे दलित आणि ग्रामीण साहित्य असा भेदाभेद न करता, सर्वांनी मिळुन साहित्याची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज आहे.सर्वसमावेशक विकास समाजाला एकत्र आणेल आणि त्यातुन सकस साहित्यनिर्मिती होइल, असा आशावाद परिसंवादामध्ये वक्तांनी व्यक्त केला. येथील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बदलते सामाजिक-राजकीय अस्तित्व आणि दलित व ग्रामीण साहित्य या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. दत्ता भगत अध्यक्षस्थानी होते.परिसंवादात अतुल लोंढे, प्रकाश खरात, डॉ. रा.रं.बोराडे, प्रा. शेषराव मोहिते, विनय कोरे, शेखर गायकवाड आदिंनी सहभाग नोंदवला. सर्वांनी सहित्य संमेलनाच्या नियोजनाचे भरभरुन कौतुक केले. या संमेलनाने यापुढील संमेलनांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे, असेही मत या वेळी मांडण्यात आले.खरात म्हणाले, ‘‘ नकार, विद्रोह आणि मानवता ही दलित सहित्याची त्रिसुत्री आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात अभुतपुर्व जाग्रुती केली. मात्र, आता जीवनचे संदर्भ बदलले आहेत. दलित साहित्याच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मोहिते म्हणाले, ‘‘ अर्थकारण हा सामाजिक आणि राजकीय बदलाचा पाया आहे. सकारात्मक राजकीय परिवर्तनाचा लाभ केवळ शहरी भागाला झाला. ग्रामीण भागाला मात्र जाणीवपुर्वक वंचित ठेवण्यात आले आहे. शेतक- यांच्या आत्महत्याकडे अत्यंत असंवेदनशीलतेने पाहिले जाते. हे सर्व चित्र ग्रामीण साहित्यामध्ये पहायला मिळते.आजकाल दलित साहित्यिक स्वतला दलित म्हणवून घेत नाहीत. दुसरीकडे या साहित्यिकांना एका चौकटीत बसवण्याचे, त्यांची अवहेलना करण्याचे काम समाजाकडुन केले जाते. शेखर गायकवाड म्हणाले, प्रशासकीय काम करताना ग्रामीण जीवनाचे अनेक पदर अनुभवायला मिळतात. वास्तव,भाषा, संस्कृती झपाट्याने बदलत आहे. या बदलाचे प्रतिबिंब साहित्यावर पडायला हवे.कोरे म्हणाले, ‘‘ समाजरचना बदलण्याचे काम सहकार चळवळीने केले. मात्र, या चळवळीवर सकारात्मक पद्धथीने झालेले लिखाण अपवादात्मक रितीनेच पहायला मिळेल. बदलती सामाजिक, राजकीय व्यवस्था लक्षात घेता भविष्यात साहित्यिकांना मोठे योगदान द्यावे लागणार आहे.भगत यांनी समाजातील बदलावर नेमके भाष्य केले. ते म्हणाले, समाज बदलत आहे. माणुस नव्याने विचार करु लागला आहे. आता यापुढे जाउन जातीभेद नष्ट करण्याची, त्यासाठी साहित्यातुन जाग्रुती करण्याची गरज आहे. वैज्ञानिक आव्हाने पेलण्याचे बौध्दिक सामर्थ्य समाजात निर्माण करण्याची गरज आहे. पुरुषोत्तम काळे यांनी सूत्रसंचालन केले.