शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

प्रियंका राऊतनं संघर्षग्रस्त परिस्थितीत मिळवले 77 टक्के

By admin | Updated: May 25, 2016 19:34 IST

विद्यार्थिनी प्रियंका संतोष राऊत हिच्या संघर्षग्रस्त प्रवासातील एका टप्प्यावर बुधवारी यशाची मोहोर उमटली.

राकेश घानोडे

नागपूर, दि. 25 -  पालकांची शिकविण्याची क्षमता नसतानाही जीवन फुलविण्याच्या मार्गावर चालत सुटलेली आर. एस. मुंडले धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका संतोष राऊत हिच्या संघर्षग्रस्त प्रवासातील एका टप्प्यावर बुधवारी यशाची मोहोर उमटली. प्रियंकाने इयत्ता बारावीची परीक्षा ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. यापुढे ती बी.ए. पदवीला प्रवेश घेणार असून त्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे तिचे लक्ष्य आहे. प्रियंका कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेत आहे हे पाहिल्यास, तिला सलाम करण्यासाठी हात आपोआपच वर उठतात.प्रियंकाचे वडील मोटरसायकल दुरुस्तीचे, तर आई घरकाम करते. त्यांना प्रियंकासह एकूण सहा मुली आहेत. प्रियंका दुसऱ्या क्रमांकाचे अपत्य. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीचे शिक्षण दहावीपूर्वीच सुटले. दोन बहिणी शिक्षणासाठी मामाकडे राहात आहेत. प्रियंकाचे वडील मूळचे गोंदिया जिल्ह्यातील. उदरनिर्वाहासाठी नागपुरात आल्यानंतर काही दिवसांनी ते मूळ गावात परत गेले. त्यावेळी प्रियंका दहावीला होती. तिला कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सुरूच ठेवायचे होते. परिचितांनी मदत केल्यामुळे ती बाजारगावातील आश्रमशाळेत राहिली. तेथून तिने दहावीची परीक्षा ७२ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. आश्रमशाळेत ती ह्यटॉपरह्ण होती. यानंतर पुढील शिक्षणासाठी तिला भावणा जैन यांनी सहकार्य केले. इयत्ता अकरावी पूर्ण होतपर्यंत ती जैन यांच्याकडे राहिली. तिचा इयत्ता बारावीच्या शिक्षणाचा खर्च जॉली थॉमस यांनी उचलला. थॉमस यांच्याकडे राहून तिने इयत्ता बरावीचा महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. प्रियंकासोबत बोलल्यानंतर तिची जिद्द किती बळकट आहे हे जाणवते. परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही तिने प्रयत्नांचा हात कधीच सोडला नाही. प्रयत्न तेथे परमेश्वर असल्याचे ती म्हणते. विविध अडचणींवर मात करून मिळणाऱ्या वेळात ती केवळ अभ्यासच करीत होती. अभ्यासास शांत वातावरण मिळण्यासाठी ती मध्यरात्रीनंतर उठायची. तिचा हा ध्यास पुढेही कायम राहील हे नक्की. प्रियंका आता एक खासगी जॉब करीत आहे. तिने राहण्यासाठी भाड्याची खोली घेऊन स्वतंत्र होण्याच्या दिशेने हिंमतीने पुढे पाऊल टाकले आहे. ती खोलीचे भाडे देत असली तरी भोजनाचा खर्च मात्र तिची अम्मा म्हणजे जॉली थॉमस याच करीत आहे. तिने बारावीच्या यशाचे श्रेय अम्मासह सर्व शिक्षकांना दिले.