अमरावती : प्रियकराच्या डोळ्यांदेखत विद्यार्थिनीवर 2 तरूणांनी सामूहिक अतिप्रसंग केला. ही खळबळजनक घटना स्थानिक एक्सप्रेस हायवेवरील टोल नाका परिसरात गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. पीडित तरूणी यवतमाळ जिलच्या दिग्रस तालुक्यातील रहिवासी असून ती अमरावती शहरातील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत आहे. पोलिसांनी सतीश शिवनारायण जयस्वाल (32) व रुपेश हिंमत वडतकर (3क्) या आरोपींना अटक केली.
यवतमाळ जिलतील दिग्रस तालुक्यातील 21 वर्षीय तरूणी येथे बीसीएच्या शिक्षणासाठी आली होती. तिचे अमित (22)या अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला होता. बीसीएच्या परीक्षेचा गुरुवारी निकाल लागला.त्यानंतर ते दोघे नांदगाव पेठ मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. तेथे अमितने बिअर ढोसली. त्यानंतर दोघेही त्यांच्या दुचाकीने एक्सप्रेस हायवे मार्गाने घरी जाण्यासाठी निघाले. थोडय़ा वेळानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरूणांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरूवात केली. अमित जखमी झाल्याचे पाहून त्यांनी तिला तेथील एका शेतशिवारात नेऊन तिच्यावर सामूहिक अतिप्रसंग केला. त्यांच्याकडील 5क्क् रुपये रोख व मोबाईल हिसकून आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला. त्यानंतर ते घाबरलेल्या अवस्थेत एक्सप्रेस हायवेवर पोहचले. त्यांनी ये-जा करणा:या अनेकांकडून मदत मागितली. परंतु कोणीही मदत केली नाही. या मार्गाने दुचाकीवरून जाणा:या दाम्पत्याला घटनाक्रम सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित दाम्पत्याने याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली.घटनेच्या वेळी आरोपींनी प्रियकराचे कपडे काढून घेतले. घटनेनंतरही या जोडप्याला नराधमांनी रात्री 9 ते 12 वाजेर्पयत डांबून ठेवले. इतकेच नव्हे तर आरोपींनी त्यांची दुचाकी घटनास्थळापासून काही अंतरावर उभी केली होती. या दुचाकीचा क्रमांक या मार्गावरून जाणा:या एका व्यक्तीने टिपून ठेवला होता. हा क्रमांक मिळताच पोलीसांनी सतीश व रुपेशला अटक केली आहे. आरोपी रुपेश हा सर्पमीत्र आहे. दोघेही वाळू पुरवठय़ाचा व्यवसाय करतात. (प्रतिनिधी)
च्दोघे नांदगाव पेठ मार्गावरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. तेथे अमितने बिअर ढोसली. त्यानंतर दोघेही त्यांच्या दुचाकीने एक्स्प्रेस हायवे मार्गाने घरी जाण्यासाठी निघाले.
च्थोडय़ा वेळानंतर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरूणांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरूवात केली. अमित जखमी झाल्याचे पाहून त्यांनी तिला तेथील एका शेतशिवारात नेऊन तिच्यावर सामूहिक अतिप्रसंग केला.