शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सिंचन प्रकल्पांना खासगी क्षेत्रातून निधी

By admin | Updated: June 21, 2015 01:21 IST

राज्य सरकारने सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून खासगी क्षेत्रातील संस्था त्यासाठी निधी देण्यास तयार आहेत. मात्र त्यांना नियोजनपूर्वक काम होईल,

जळगाव : राज्य सरकारने सिंचनाला सर्वोच्च प्राधान्य दिले असून खासगी क्षेत्रातील संस्था त्यासाठी निधी देण्यास तयार आहेत. मात्र त्यांना नियोजनपूर्वक काम होईल, असा विश्वास देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.जलसंपदा विभागातील अभियंत्यांची कार्यशाळा येथील जैन उद्योग समुहाच्या गांधी रिसर्च फाउंडेशन सभागृहात शनिवारी झाली. नियोजनातील त्रुटींचा सिंचन योजनांना मोठा फटका बसतो. त्यामुळे चांगले नियोजन करा, कामकाजात पारदर्शकता ठेवा. निधीची कमतरता भासणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.जलसंपदा विभागाच्या कामाचा गौरव करताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने पथदर्शी प्रकल्प तयार केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. केवळ जलसंपदा विभागातील अभियंत्यांच्या प्रचंड क्षमतेमुळेच हे शक्य झाले आहे. एका संक्रमण अवस्थेतून हा विभाग जातो आहे. गेल्या कालखंडात या विभागाची बरीच बदनामी झाली, असा चिमटाही त्यांनी मारली. या स्थितीतून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करु. गतिमान व पारदर्शी निर्णय घेतले तर कामांना गती येईल, त्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे. चुका होतील पण त्याचे मूल्यमापन झाले पाहिजे.सिंचन योजनांवर आपण हजारो कोटी रुपये खर्च करतो पण पुनर्वसन, भूसंपादनासारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. जमीन देणाऱ्यास जीवनमान उंचावेल, अशी मदत केल्यास तो प्रकल्पास विरोध करणार नाही. जागतिक बँक, खासगी क्षेत्राकडून सिंचन योजनांना निधी मिळू शकतो. मात्र त्यासाठी धोरण पारदर्शक ठेवावे लागेल असे त्यांनी सांगितले. महसूल मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष भवरलाल जैन आदींनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)