शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीत खासगी व्यक्ती अव्वल, अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून खांद्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:59 IST

जानेवारी ते २३ आॅगस्टदरम्यान राज्यात एसीबीने ५४८ सापळे यशस्वी केले.

अमरावती : जानेवारी ते २३ आॅगस्टदरम्यान राज्यात एसीबीने ५४८ सापळे यशस्वी केले. त्यात लाचखोरी वर्ग १ व वर्ग २ च्या तुलनेत खासगी व्यक्ती अव्वल राहिले. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी लाचेसाठी खासगी व्यक्तींच्या खांद्याचा वापर तर करत नाहीत ना, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.आपण एसीबी सापळ्यात अडकू नये आणि अडकलोच तर खासगी व्यक्तींवर ते बालंट ढकलू द्यायचे, या मानसिकतेतून स्वत: सहीसलामत राहण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर अत्याधिक होऊ लागल्याचे निरीक्षण एसीबीने नोंदविले आहे. एसीबीने जानेवारी ते २३ आॅगस्ट २०१८ दरम्यान राज्यात एकूण ५४८ प्रकरणे उघड केलीत. त्यात वर्ग १ चे ४८, वर्ग २ चे ०४, वर्ग ३ चे ४५५, वर्ग ४ चे २८ व तब्बल ८७ खासगी व्यक्ती अडकली. वर्ग १ व वर्ग २ च्या लाचखोर अधिका-यांपेक्षा खासगी व्यक्तींचा आकडा अधिक आहे. या ५४८ प्रकरणांमध्ये एकूण ९७.६५ लाख रुपये जप्त करण्यात आले. यात नेहमीप्रमाणे महसूल, पोलीस व महावितरणचे अधिकारी-कर्मचारी लाचखोर निघाले. मात्र, त्याचवेळी या तीन विभागांत अनुक्रमे १८, १६ व १० खासगी व्यक्ती एसीबीच्या सापळ्यात अडकल्या. त्यामुळे अनेक अधिकारी-कर्मचारी लाच घेण्यासाठी खासगी व्यक्तींचा वापर अर्थात त्यांच्या खांद्याचा वापर करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.२०१७ मध्ये १३७ खासगी व्यक्ती लाचखोरसन २०१८ च्या आॅगस्टपर्यंत ८७ खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्या, तर २०१७ मध्ये राज्यात हा आकडा १३७ होता. त्यापूर्वी २०१६ मध्ये १२० खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली. २०१५ मध्ये २१९, २०१४ मध्ये २०५ तर सन २०१३ मध्ये ८७ खासगी व्यक्तींवर एसीबीने सापळा टाकला.