शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

शासकीय भरतीतून खासगी कंपन्या बाहेर; मंत्रिमंडळ निर्णयाच्या एक महिन्यानंतर निघाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 6:03 AM

गट ब आणि गट क कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबविण्याचे कंत्राट महाविकास आघाडी सरकारच्या काळात २१ जानेवारी आणि ४ मार्चच्या आदेशानुसार पाच कंपन्यांना देण्यात आले होते. 

मुंबई : राज्य सरकारच्या विविध खात्यांमधील भरती प्रक्रियेसाठीच्या परीक्षांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या वादग्रस्त कंपन्यांसह सर्वच कंपन्यांकडील काम स्थगित करण्याचा आदेश मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाने काढला. राज्य मंत्रिमंडळाने १५ डिसेंबरच्या बैठकीत हा निर्णय घेतल्यानंतर एक महिन्याने हा आदेश निघाला आहे. गट ब आणि गट क कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबविण्याचे कंत्राट महाविकास आघाडी सरकारच्या काळात २१ जानेवारी आणि ४ मार्चच्या आदेशानुसार पाच कंपन्यांना देण्यात आले होते. सर्वात आधी २१ जानेवारी २०२१ रोजी एक आदेश काढून चार कंपन्यांना नोकरभरती प्रक्रिया राबविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्या यादीमध्ये न्यासा कम्युनिकेशन कंपनीचा समावेश नव्हता. मात्र, न्यासा कंपनी त्याविरुद्ध उच्च न्यायालयात गेली आणि न्यायालयाने आदेश दिल्याने न्यासा कम्युनिकेशनलादेखील कंत्राट देण्यात आले होते. आता पाच कंपन्यांना स्थगिती देताना या परीक्षा टीसीएस, आयबीपीएस, एमकेसीएलच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कंत्राट रद्द नाही, कंत्राटाला स्थगितीपाचही कंपन्यांना नोकरभरतीचे पाच वर्षांचे कंत्राट देण्यात आले होते. नोकरभरती अत्यंत वादग्रस्त ठरल्यानंतर या कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्याची भूमिका सरकारने घेतली होती. मात्र, मंगळवारी निघालेल्या आदेशात रद्द ऐवजी स्थगित असा शब्द वापरण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळानेही कंत्राटास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता, असे आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी ही भूमिका घेण्यात आल्याची माहिती आहे. ‘या’ पाच कंपन्यांना स्थगितीमे. ॲपटेक लिमिटेड, मे. जीए सॉफ्टवेअर प्रा.लि., मे. जींजर वेब्ज प्रा.लि., मेटा आय टेक्नॉलॉजी प्रा.लि., मे. न्याय कम्युनिकेशन प्रा.लि. या पाच कंपन्यांना यापूर्वी दिलेले नोकरभरतीचे कंत्राट स्थगित करण्यात आले आहे. यातील जीए आणि न्यासा या कंपन्यांची नावे प्रामुख्याने भरती घोटाळ्यात समोर आली आहेत.