शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

युती शासनावर पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल!

By admin | Updated: April 2, 2015 00:47 IST

विधानसभा अधिवेशन : धाडसी अर्थसंकल्प मांडण्याची संधी गमावल्याचा आरोप

कऱ्हाड : ‘युती सरकारला अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी ठोस उपाययोजना करावयाची संधी होती. ती युती शासनाने हुकवली आहे. महाराष्ट्रापुढील प्रमुख आव्हानांना तोंड देण्याकरिता ठोस उपाययोजना केलेली दिसून आली नाही,’ अशी टीका माजी मुख्यमंत्री व कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत भाग घेताना ते म्हणाले, ‘वित्तमंत्र्यांचे परिश्रम पाहून आमच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. राज्याच्या सर्वांगीण व समतोल विकासाकरिता जे आवश्यक आहे, त्याचा समावेश असेल, असे वाटले होते; परंतु आमचा हिरमोड झाला आहे. त्यांनी राज्यातील सिंचन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचा प्रश्न, विदर्भातील सिचंन व उद्योग व्यवसायातील बॅकलॉग याबाबत अर्थसंकल्पात काय तरतूद केली आहे,’ असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला. विदर्भासाठी जादा तरतूद करून बॅकलॉग भरण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. याचा अर्थ पूर्वीच्या सरकारने अन्याय केला, असे म्हणणे चुकीचे आहे. विदर्भातील सिचंन व उद्योगाचा बॅकलॉग दूर झाला पाहिजे. विदर्भात दरडोईच्या बाबतीत जे जिल्हे खाली आहेत. त्यांना वर आणणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पॅकेज देण्याची घोषणा केली होती. पण अंदाजपत्रकात याबाबतची काहीही तरतूद नाही. याची खंतही त्यांनी व्यक्त केली.गारपीटग्रस्तांसाठी जाहीर केलेला निधी गेला कुठे? जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत, विश्वास उडेल असे काहीही करता कामा नये, ‘जलयुक्त शिवार’ योजना अतिशय चांगली असून, आमच्या शासनाने याचे उद्घाटन केले होते. आमच्या काळात या योजनेचे नाव ‘जलयुक्त ग्राम’ असे होते. नवीन सरकारने केवळ नावात बदल करून राबविली आहे. यावर्षी राज्याचा विकासदर दोन टक्क्यांनी खाली घसरलेला आहे. तो दोन अंकी नेण्याचे आश्वासन वित्तमंत्र्यांनी दिलेले आहे. परंतु ठोस पावले उचललेली दिसून येत नाहीत. सिंचनावर दहा हजार कोटींपेक्षाही जास्त तरतूद असायला हवी होती. अर्थसंकल्पात सात हजार दोनशे कोटींची तरतूद केलेली आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होणार नाही. ब्रिटनचे पंतप्रधान जेव्हा मुंबईला आले होते, त्यांची आणि माझी बैठक झाली होती. आम्ही दोघांनी मिळून मुंबई-बेंगलोर कॉरिडोअरसाठी ब्रिटन सरकारकडून मदत घ्यावी, म्हणून आम्ही प्रस्ताव मांडला. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली. त्याबद्दल अर्थसंकल्पात कोठेही वाच्यता नाही. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र, मिहान प्रकल्प, उद्योग धंंद्यांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा, सेझ प्रकल्प, टोल माफी, स्मार्टसिटी, मेट्रो रेल , स्वच्छ भारत अभियान, एल.बी.टी. आदी विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण मत मांडले. (प्रतिनिधी)