शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गणपतीसाठी एसटीला प्राधान्य

By admin | Updated: August 21, 2014 00:00 IST

मुलुंड, भांडुपसह ठाणो जिल्ह्यातील 33 हजार 6क्4 चाकरमानी एसटीने कोकणातील त्यांच्या गावी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी जात आहेत.

सुरेश लोखंडे - ठाणो
येवा कोकण आपलाच आसा! कोकणवासीयांच्या या हाकेला साद देऊन मुलुंड, भांडुपसह ठाणो जिल्ह्यातील 33 हजार 6क्4 चाकरमानी एसटीने कोकणातील त्यांच्या गावी गणोशोत्सव साजरा करण्यासाठी जात आहेत. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ठाणो विभागाने सुमारे 741 बसची व्यवस्था केली आहे. 
कोकणच्या घाटातील नागमोडी रस्त्यांवरून या 741 बस 24 ते 28 ऑगस्ट या पाच दिवसांच्या कालावधीत धावणार आहेत. एका बसमध्ये सुमारे 44 प्रवाशांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. यानुसार, यातील 33 हजार 6क्4 प्रवाशांपैकी 17 हजार 2क्4 जणांनी त्यांच्यासाठी स्वतंत्र 391 बसेस बुक केल्या आहेत. 
परिवारासह 15 हजार 4क्क् प्रवाशांनी 35क् बस आधीच बुक करून घेतल्या आहेत. उर्वरित सुमारे एक हजार चाकरमानी या बसमध्ये उभे राहून किंवा मोकळ्या जागेत बसून जात असल्याचे एसटीच्या ठाणो विभागीय कार्यालयाने लोकमतला सांगितले. 
 प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने या बस ठाणो येथील सीबीएस बसस्थानकातून सुटणार आहेत. याशिवाय मुलुंड, भांडुप, बोरिवली नॅशी, भाईंदर, कल्याण आणि विठ्ठलवाडी येथून सुटणार आहेत. प्रथमत: 24 ऑगस्टला बोरिवली येथून दोन व सीबीएस येथून एक बस सुटणार आहे. 
यानंतर, मात्र 25 ऑगस्टला पाच बसेस, 26 ला 166 बस, 27 सर्वाधिक 437 आणि 28 ऑगस्टला 11क् बस कोकणात धावणार आहेत. ठाणो विभागाच्या या बसेस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जाणार आहेत. यासाठी ठाणो विभागाच्या 191 बस तर उर्वरित 55क् बस नाशिक, नगर, धुळे,  औरंगाबाद या विभागांतून मागवण्यात आल्या आहेत. या सर्व बसेस नव्या करकरीत आहेत. 
त्या पूर्णपणो बुक झालेल्या असल्यामुळेकेवळ चालक या बसमध्ये राहणार आहेत. बस प्रवासादरम्यान चिपळूण, सावंतवाडी, मालवण, देवगड,  लिसंगी, देवळे, अंजर्ले, जैतापूर, गणपतीपुळे, कणकवली, वेंगुर्ला, साखरपा, कासे, म्हसुरे, दापोली, बागमांडला, राजापूर, वैभववाडी, कुडाळ, नारे, विजयदुर्ग, अलिबाग, नरवन, आंबोली, दिवे आगार, वीर बंदर, शिवथरघळ, खेड, मुरूड, जंजिरा, दाभोळ, जयगड, फोंडा, o्रीवर्धन आणि तळवली आदी प्रमुख बसस्थानकांचा समावेश आहे. यानंतर, 4 ते 1क् सप्टेंबरदरम्यान ठाण्याकडे परतणार आहेत. या जादा एसटी बसेसमुळे प्रवाशांत समाधान आहे.
 
गस्ती पथक : रस्त्यांवर एसटीच्या सुरक्षारक्षकांसह पोलिसांचे गस्ती पथक रात्रंदिवस गस्त घालणार आहे.
कंट्रोलर : कळंबोली येथे चालकांच्या मार्गदर्शनासाठी खास कंट्रोलरची व्यवस्था करण्यात आली आहे.
फिरते दुरुस्ती पथक : या रस्त्यांवर ठाणो, मुंबई, रायगड एसटी विभागांचे दुरुस्ती पथक तैनात राहणार आहे.
 
तपासणी पथक : रस्त्यांवर ठिकठिकाणी तपासणी पथकाची वाहने राहणार आहेत
रस्त्यांचे नकाशे : चालकांसोबत रस्त्यांचे नकाशे व सर्व बसस्थानके व अधिकारी मोबाइल व दूरध्वनी क्रमांक राहणार
औषधपेटी : प्रथमोपचारासाठी औषधपेटी उपलब्ध असून त्यात उलटी, डोकेदुखी प्रतिबंध गोळ्यांची उपलब्धता
 
च्गणपतीसाठी या वर्षी 741 बस कोकणात धावणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी 56 बसेस जास्त सोडल्या आहेत. मागील वर्षी 685 बस एक लाख 85 हजार किलोमीटर धावल्या  होत्या. 
 
च्त्यातील 3क् हजार 64क् प्रवाशांकडून 48 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. या वर्षी सुमारे 33 हजार 6क्4 प्रवाशांकडून 55 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.