शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भरती प्रक्रियेत बडतर्फ कर्मचा-यांना प्राधान्य!

By admin | Updated: October 17, 2014 00:37 IST

डॉ. पंदेकृविच्या कुलगुरूंनी घेतली कुलपतींची भेट.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फ कर्मचार्‍यांना नव्याने भरती प्रक्रीया राबवून गुणवत्तेनुसार सेवेत समाविष्ट करण्यास कृषी विद्यापीठ अनुकूल आहे; परंतु याकरिता महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाची प्रक्रिया सुरू होण्याची गरज असल्याने, कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी कृषी विद्यापीठांचे कुलपती तथा राज्याच्या राज्यपालांची मंगळवारी भेट घेतली. नोकर भरतीत अनियमितता झाल्याच्या पृष्ठभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कृषी विद्यापीठाच्या ८३ कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर ८ ऑक्टोबर रोजी शिक्कामोर्तब केले. त्यानुसार कृषी विद्या पीठ प्रशासनाने वरिष्ठ संशोधन आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदावरील या कर्मचार्‍यांच्या बडतर्फीचे आदेश बजावल्याने या कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कर्मचार्‍यांच्या बडतर्फीवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी न्यायासाठी सवरेच न्यायालयात धाव घेतली होती. ४ एप्रिल २0१४ रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. कृषी विद्यापीठाने नव्याने भरती प्रक्रिया राबवून सर्व वरिष्ठ व कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना गुणवत्तेनुसार सामावून घ्यावे, असे आदेश सवरेच न्यायालयाने त्यावेळी सुनावणीदरम्यान दिले होते; परंतु कृषी विद्यापीठाने भरती प्रक्रियाच पूर्ण केली नाही. त्यामुळे बडतर्फीची कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांनी १४ ऑक्टोबर रोजी कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयात ठिय्या दिला होता. या प्रकरणी कुलगुरू डॉ. दाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, असे आश्‍वासन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एम. भाले यांनी दिल्याने कर्मचार्‍यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दरम्यान, डॉ. दाणी यांनी कुलपतींची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणी पुन्हा कुलपतींशी चर्चा केली जाणार आहे. कुलपतींशी चर्चा झाल्यानंतर कुलगुरू आणि या कर्मचार्‍यांमध्ये बुधवारी चर्चा झाली असून, या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेण्याचे आश्‍वासन डॉ. दाणी यांनी कर्मचार्‍यांना दिले आहे.*भरती मंडळाचा घोळ भोवला राज्यात महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती निवड मंडळाची स्थापना झाली आहे. या स्थापनेला एक वर्ष उलटले असून, अद्याप या मंडळाचे काम सुरू झाले नसल्याने राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधकांची भरती प्रक्रिया ठप्प पडली आहे. त्याचा फटका या ८३ कर्मचार्‍यांनाही बसला आहे.