शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात आदिवासींसाठी रोजगाराचे जाळे, पोल्ट्री फार्म युनिट उभारणीला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 20:11 IST

मेळघाटात ज्या गावांमध्ये व्हिलेज इको टुरिझम कमिटी अस्तित्वात आहे, त्या गावांत आदिवासींना रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबत करार अंतिम टप्प्यात आहे. करार होताच गावागावांत पोल्ट्री फार्म युनिटचे जाळे उभारले जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

अमरावती, दि. 10 - मेळघाटात ज्या गावांमध्ये व्हिलेज इको टुरिझम कमिटी अस्तित्वात आहे, त्या गावांत आदिवासींना रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासोबत करार अंतिम टप्प्यात आहे. करार होताच गावागावांत पोल्ट्री फार्म युनिटचे जाळे उभारले जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.मेळघाटात व्याघ्र संवर्धन काळाची गरज असून सोबतच आदिवासींच्या उपजीविकेसाठी रोजगार हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाने जनविकास योजनेंतर्गत आतापर्यंत पाचशे आदिवासी युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. आदिवासींसाठी राबविल्या जाणा-या योजना ह्या कागदावरच राहायला नको, याची काळजी घेतली जात आहे. मेळघाटात लवकरच पोल्ट्री फार्म युनिटची संकल्पना पूर्णत्वास येणार आहे. यापूर्वी हॉटेल मॅनेजमेंट, इलेक्ट्रिशियन, वातानुकूलित यंत्र दुरुस्ती, शिवणकाम, वेल्डिंग प्रशिक्षण तर आॅटोमोबाईल प्रशिक्षणातून आदिवासी युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.व्हिलेज इको टुरिझम अंतर्गत १८ ते ३४ वर्षे वयोगटातील आदिवासी युवक-युवतींसाठी ह्यप्रथमह्ण नामक संस्थेच्या माध्यमातून निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका उमेदवाराच्या प्रशिक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प १६ हजार रुपये खर्च करीत आहे. प्रशिक्षणाअंती रोजगारासाठी पाठविलेल्या आदिवासी युवक, युवतींबाबतची माहिती घेण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.आदिवासी महिला तयार करताहेत लाखेच्या बांगड्यामध्य प्रदेशातील बालाघाट येथील सी.के.लाख युनिटसोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार आदिवासी महिलांना लाखेच्या बांगड्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. बांगड्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य एजन्सी पुरवीत असून बांगड्या खरेदी करण्याची जबाबदारीदेखील याच एजन्सीकडे आहे. आतापर्यंत २२९ आदिवासी महिलांनी प्रशिक्षण घेतले असून, त्या घरबसल्या लाखेच्या बांगड्या तयार करून रोजगार मिळवीत आहेत.