शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

कॅन्सरच्या उपचारासाठी पंतप्रधानांनी दिली मदत

By admin | Updated: December 23, 2016 20:44 IST

हालाखिच्या परिस्थितीत जीवन जगत असताना साक्री शहरातील एका व्यक्तीच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. या रोगाचे निदान करण्यासाठी ६ लाख रुपये खर्च डॉक्टरांनी

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 23 -  हालाखिच्या परिस्थितीत जीवन जगत असताना साक्री शहरातील एका व्यक्तीच्या पत्नीला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. या रोगाचे निदान करण्यासाठी ६ लाख रुपये खर्च डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या कुटुंबीयांच्या मदतीला साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले. त्यांनी या महिलेच्या उपचारासाठी १ लाख ७५ हजार रुपयांची तातडीची मदत दिली आहे. साक्री (जि. धुळे) शहरातील कैलास मोरे यांची ही कहाणी....चार जणांचे सुखी कुटुंब. त्या कुटुंबाचा गाडा रेटण्यासाठी दिवसभर कैलास मोरे लोटगाडीवर चणे, फुटाणे व शेंगदाणे विकून कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह करतात. त्यांना मनीषा (इयत्ता ७ वी) व लोकेश (इयत्ता ४ थी) ही दोन मुले आहेत. त्यांची पत्नी सिंधूबाई या मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यासाठी त्यांचे पती कैलास यांना मदत करतात. परंतु, गेल्या महिन्यांपूर्वी सिंधूबाई यांची प्रकृती बिघडली. त्यांची तपासणी केली असता त्यांना कॅन्सर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. कॅन्सरवर उपचार करणे महागडे असल्याने समाजबांधवांनी व काही दानशूर लोकांनी त्यांना मदत केली. परंतु, त्यांच्या उपचारासाठी सहा लाख रुपये खर्च येणार होता. जमलेल्या पैशातून मुंबई येथे टाटा हॉस्पिटलमध्ये सिंधूबाई यांच्यावर उपचार सुरू होते. पैशांची चणचण असल्याने कैलास यांनी सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले; व मदतीचे आवाहन केले. हे पत्र नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हीना गावीत यांच्याकडे दिल्यावर त्यांनी ते त्वरित पंतप्रधान कार्यालयात पाठवले. हॉस्पिटलच्या नावावर पैसे वर्ग पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीचे एक पत्र कैलास मोरे यांना पाठवले. या पत्रात पत्नीच्या उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून १ लाख ७५ हजार रुपये मंजूर केले. ही रक्कम टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे वर्ग करण्यात आली आहे. याबरोबर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या पत्रात कैलास यांच्या पत्नीची प्रकृती बरी होईल, अशा शुभकामना पाठवल्या आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली मदतीमुळे मोरे परिवाराने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.