शहरं
Join us  
Trending Stories
1
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ५ जण दगावल्याची भीती
2
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
3
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
4
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
6
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
7
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
8
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
9
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
10
Pawan Singh : "सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
11
722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर
12
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
13
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
14
हृदयद्रावक! फुगा फुगवताना अचानक फुटला, श्वास नलिकेत अडकला अन्...; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
15
Smriti Mandhana: "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
16
मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी
17
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
18
हवाईत जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक, 400 मीटर उंच लावा उसळला; पाहा VIDEO
19
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
20
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑपरेशन सिंदूर’ची पारदर्शकता पंतप्रधानांनी समोर आणावी, पृश्वीराज चव्हाण यांचे आव्हान 

By नितीन काळेल | Updated: May 21, 2025 19:24 IST

संसदेचे अधिवेशन बोलवा; देशात खोट्या बातम्या दिल्या 

सातारा : पाकिस्तानात युद्ध जिंकल्यासारखा जल्लोष सुरू आहे, तर भारतात काहींनी खोट्या बातम्या दिल्या. यातून देशाची विश्वासार्हता कमी झाली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीही ८८ परदेश दौरे केले. पण, पाकिस्तानच्या मागे अनेक देश उभे राहिले. आपल्या परराष्ट्र धोरणाचा पराभव ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान झाला का हे पाहावे. तसेच याची उत्तरे मिळण्यासाठी पंतप्रधानांनी संसदेचे अधिवेशन बोलवून पारदर्शकता समोर आणावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण यांनी दिले.सातारा येथे काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. काँग्रेसच्या ‘जय हिंद’ यात्रेसाठी आल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्याही प्रश्नांना उत्तरे दिली. काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, अजित पाटील-चिखलीकर, रजनी पवार, जगन्नाथ कुंभार, निवास थोरात आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने आॅपरेशन सिंदूर राबवले. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. काहीजण खोट्या बातम्या देत आहेत. खोट्या बातम्या देणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला सात अब्ज डाॅलरचे कर्ज देऊ नये. ते आतंकवाद्यांसाठी वापरतील म्हणून भारताने कर्ज थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, भारताला यश आले नाही. पाकिस्तानच्या बाजूने २४ देश उभे राहिले. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे हे अपयश नाही का? त्यातच भारत आता परदेशात शिष्टमंडळे पाठवणार आहे. यामध्ये सोयीची नावे दिसतात. हे विश्वासाच्या वातावरणातून होण्याची गरज होती. हे संसदीय परंपरेला धरूनही नाही.देशातील युद्ध परिस्थितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशाला विश्वासात घ्यायला हवे होते. विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला होता. त्यांनाही परिस्थिती सांगायला हवी होती, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, १९४७, ६२, ६५, ७१, ९९ अशी अनेक युद्धे भारताने केली. त्या-त्या वेळी संसदेत सरकारने माहिती दिली. पण, आताच्या पंतप्रधानांकडून काहीही होत नाही. पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा सर्व विरोधी पक्षांची बैठक घ्यावी. संसदेचे अधिवेशन बोलवावे. चर्चा करुन आॅपरेशन सिंदूरबाबतची पारदर्शकता समोर आणावी. तसेच मोदी सरकार अमेरिकेला शरण गेले का? ट्रम्प सरकारने दबाव टाकला का हेही पाहावे लागेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणOperation Sindoorऑपरेशन सिंदूरprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी