शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

डाळींना महागाईचा ‘तडका’

By admin | Updated: May 17, 2015 01:45 IST

गतवर्षीच्या तुलनेत खाद्यतेल व तांदळाच्या भावात घट झाली असली तरी डाळींचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. तसेच गहू व ज्वारीच्या भावातही काहीशी वाढ झालेली दिसून येते.

पुणे : गतवर्षीच्या तुलनेत खाद्यतेल व तांदळाच्या भावात घट झाली असली तरी डाळींचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. तसेच गहू व ज्वारीच्या भावातही काहीशी वाढ झालेली दिसून येते. दैनंदिन जीवनात सर्वाधिक मागणी असलेल्या डाळी, गहू व ज्वारी या अन्नधान्याचे भाव गतवर्षीच्या तुलनेत अधिक असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. अन्नधान्य व इंधनाच्या किमती कमी झाल्याने महागाई निर्देशांकात लक्षणीय घट नोंदविली गेली आहे. मात्र, सर्व अन्नधान्याचे भाव कमी झालेले नाहीत. दैनंदिन जीवनात नागरिकांना खाद्यतेलांसह तांदूळ, गहू, ज्वारी, डाळी या अन्नधान्याची सर्वाधिक गरज भासते. या अन्नधान्यांचे गतवर्षीचे घाऊक भाव आणि सध्याचे भाव विचारात घेतल्यास अजूनही महागाईने त्यांची पाठ सोडली नसल्याचे दिसते.तूरडाळीचे भाव तर जवळपास दुपटीने वाढलले आहेत. मागील वर्षी मे महिन्यात तूरडाळीचे भाव क्लिंटलमागे ५८०० ते ६६०० रुपये एवढे होते. मागील आठवड्यात हे भाव ९,५०० ते १०,५०० वर जाऊन पोहोचले. हरभरा, मसूर, मटकी, उडीद या डाळींच्या भावातही सातत्याने वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत गव्हाच्या भावात क्विंटलमागे ८० ते ३०० रुपयांनी तर ज्वारीच्या भावात ५० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलात शेंगदाणा तेलाचे भाव २५० ते २७५ रुपयांनी वाढले आहेत. सोयाबीन तेलाचा भाव मागील वर्षी मे महिन्यात १५ किलोमागे सरासरी ११३० ते १२०० रुपये एवढा होता. या वर्षी या भावात १२५ ते १५५ रुपये घट झाल्याचे दिसते. सूर्यफुल तेलाच्या भावात सुमारे ६० रुपयांची घट झाली आहे.मुळातच देशांतर्गत डाळींचे उत्पादन कमी होत असल्याने भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागते. चीन, टांझानिया, बर्मा, आॅस्ट्रेलिया या देशांतून मोठ्या प्रमाणावर डाळींची आयात होते. मात्र, भारतासह या देशांतील डाळींचे उत्पादनही घटले आहे. त्यामुळे डाळींच्या भावात वाढ झाली असून, हे भाव गतवर्षीच्या तुलनेने चढेच राहण्याची शक्यता आहे.- विजय राठोड, डाळींचे व्यापारीमागील वर्षभरातील घाऊक बाजारभावमे १४सप्टेंबर १४जानेवारी १५मे १५सोयाबीन तेल११३०-१२००९८०-१०८०१०५०-११५०९७५-१०७५(१५ किलोमध्ये)सूर्यफुल तेल१०९०-११९०९५०-१०८०१०००-११५०१०३०-११३०शेंगदाणा तेल१३००-१४००१३००-१३७५१३७५-१४७५१५५०-१६७५बासमती तांदूळ१३०००-१४०००१३०००-१४०००८५००-९०००८५००-९०००(क्विंटलमध्ये)कणी३४००-३६००३२००-३५००२४००-२६००२३००-२५००कोलम३६००-४२००४२००-४५००४५००-४८००३३००-३७००आंबेमोहर५५००-१०५००५८००-६५००५०००-६०००४३००-४६००गहू १७२०-३७००१८००-३५५०१९००-३६००१८००-४०००ज्वारी१९००-३४००२०००-३५००१८५०-३७००१८५०-३६५०तूरडाळ५८००-६६००६५००-७४००७१००-८१००९५००-१०५००हरभराडाळ३५००-४०००३७००-४२००४२००-४८००५८००-६३००मसूरडाळ६३००-६४००६८००-७०००७५००-७६००७८००-८०००मटकीडाळ७७००-७८००८०००-८२००८५००-८८००१००००-१०५००