शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन येताच पडले शेतमालाचे भाव

By admin | Updated: August 29, 2016 17:06 IST

शेतक-यांचे पिक बाजारात येण्यास सुरूवात होताच शेतमालाचे भाव पडले आहेत. हमीभावापेक्षाही एक ते दीड हजार रूपये कमी दराने व्यापा-यांनी शेतमालाची खरेदी करून शेतक-यांची अक्षरशा लूट चालविली आहे.

- विवेक चांदूरकर
 
बुलडाणा, दि. 29 - शेतक-यांचे पिक बाजारात येण्यास सुरूवात होताच शेतमालाचे भाव
पडले आहेत. हमीभावापेक्षाही एक ते दीड हजार रूपये कमी दराने व्यापा-यांनी
शेतमालाची खरेदी करून शेतक-यांची अक्षरशा लूट चालविली आहे. आठ
दिवसांपूर्वी ५१०० असलेल्या मुगाचे भाव ४ हजारांवर आले आहे.
 सहा महिन्यांपासून शेतमालाच्या वाढत्या भावामुळे महागाईचा डांगोरा
पिटण्यात येत होता. मात्र, एक महिन्यापूर्वी गगनाला भिडलेले शेतमालाचे
भाव कृषी माल बाजारात येण्याला सुरूवातच होताच गडगडले आहेत. गत तीन
वर्षांच्या दुष्काळामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात कमालिची घट झाली होती.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यावर्षी विदर्भात चांगला पाऊस
झाल्याने शेतमालाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे
यावर्षी  चांगले उत्पन्न होईल अशी अपेक्षा करीत असलेल्या शेतक-यांच्या
आशेवर शेतमालाचे भाव पडल्याने पाणी फेरल्या गेले आहे.  शासनाने जाहीर
केलेल्या हमीभावापेक्षाही एक ते दीड हजार रूपये कमी भाव शेतमालाला मिळत
आहे. २१ आॅगस्ट रोजी मुगाचे भाव ५ हजार ते ५१०० रूपये प्रतिक्विंटल होते.
मुगाच्या भावात एकाच आठवड्यात हजार रूपयांनी घट आली असून २९ आॅगस्ट रोजी
४ हजार ते ४३०० रूपये हमीभाव मिळत आहे. यासोबतच हरभ-याच्या भावातही
प्रचंड घट झाली आहे. ३१ जुलै रोजी हरभ-याचे भाव ७ हजार ते ७४०० रूपये
प्रतीक्विंटल होते. २९ आॅगस्ट रोजी यामध्ये अडीच हजार रूपयांनी घट झाली
असून ५ ते ५ हजार रूपये प्रती क्विंटल हरभºयाला भाव मिळत आहे. तसेच
सोयाबिन, गहू, मका व ज्वारीच्या भावातही घट झाली आहे.
 
शेतमालाचे भाव पडण्याकरिता शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत आहे.
शेतकरी दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शासनाच्या धोरणाचा बळी ठरणार आहे.
शेतक-यांना शेती करू द्यायची नाही व ही शेती मल्टीनॅशनल कंपन्यांच्या
घशात जातील, हे शासनाचे धोरण आहे.
 - गजानन अमदाबादकर
शेतकरी नेते.
 
शेतमाल      ३१ जुलै २०१६   २९ आॅगस्ट १६
  (रूपये प्रती क्विंटल)         (रूपये प्रती क्विंटल)
हरभरा   ७ हजार ते ७४००    ४ हजार ते ५०००
मूग   ५ हजार ते ५१००   ४ हजार ते ४३००
तूर  ७००० ते ७३००  ४००० ते ५०००
सोयाबिन   ३२०० ते ३३००   ३३०० ते ३५००
गहू  १८०० ते २०००  १५०० ते १८००
ज्वारी   १३०० ते १५००  १४०० ते १६००