मुंबई : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एमबीएच्या सीईटी परीक्षेमुळे उच्च न्यायालयाने गुरुवारी खाजगी महाविद्यालयातील एमबीएचे प्रवेश येत्या २८ एप्रिलपर्यंत स्थगित केले़सीईटी परीक्षेत चुकीचे प्रश्न असल्यामुळे ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका विद्यार्थ्यांनी दाखल केल्या़ तंत्र शिक्षण विभागाने याचे प्रत्युत्तरही सादर केले़ यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने पुन्हा परीक्षा घेणे शक्य नसल्याचे सांगितले आहे़ पुढील आदेश होईपर्यंत सरकारी महाविद्यालयात एमबीएचे प्रवेश दिले जाणार नाहीत, असेही या विभागाने स्पष्ट केले़ मात्र खाजगी महाविद्यालयात एमबीचे प्रवेश सुरू असल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)
खाजगी कॉलेजमधील एमबीएचे प्रवेश रोखले
By admin | Updated: April 24, 2015 01:14 IST