शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

अर्भक मृत्यू टाळण्यासाठी 'मा' अभियान राबविणार

By admin | Updated: August 23, 2016 17:59 IST

स्तनपानाला प्रोत्साहन देण्याकरीता तसेच अर्भक मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने राज्यभरात आता 'मा' हे अभियान राबविण्यात येणार आहे.

नीलेश शहाकार

बुलडाणा, दि. २३ : नवजात अर्भकास एक तासाच्या आत स्तनपान दिल्यामुळे २० टक्के अर्भक मृत्यू टाळता येतात. ही बाब लक्षात घेता, स्तनपानाला प्रोत्साहन देण्याकरीता तसेच अर्भक मृत्यू दर कमी करण्याच्या दृष्टीने राज्यभरात आता 'मा' हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरीता अतिरिक्त निधी केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात येणार आहे.

मातेचे स्तनपान हे बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. ही बाबत लक्षात घेवून केंद्र शासनाच्यावतीने ५ आॅगस्ट पासून 'मदर एॅब्सुल्युट अ‍ॅफेक्शन' अर्थात 'मा' हे अभियानाला केंद्रस्तरावर सुरुवात करण्यात आली असून आता सदर अभियान राज्यपातळीवर राबविण्यात येणार आहे. हे अभियान जुलै २०१७ पर्यत कार्यान्वित राहणार आहे. यासाठी प्रत्येकजिल्ह्यासाठी ४.३ लाख रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

शासनाने केलेल्या सर्वक्षणानुसार, बालकांना जन्मापासून सुरुवातीच्या सहा महिन्यापर्यत स्तनपान केले जाते, अश्या बालाकांमध्ये इतर बालकांच्या तुलनेने न्युमोनिया होण्याचे प्रमाण १५ पटीने आणि अतिसार होण्याचे प्रमाण ११ पटीने कमी असते. यामुळे स्तनपाला प्रोत्साहन देण्याकरीता तसेच अर्भक मृत्यूू दर कमी करण्याच्या दृष्टीने हे अभियान राबविण्यात येत आहे,विदर्भात ५ हजार २४३ अर्भकमृत्यूची नोंदमहाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार राज्याच्या एकूण अर्भक मृत्यूतील २० टक्के मृत्यू हे विदर्भात झाले आहेत. गत वर्षभरात विदर्भात ५ हजार २४३ अर्भकमृत्यूची नोंदण करण्यात आली आहे.मात्र स्तनपान सप्ताह व गरोदर माता पोषण आहार योजनेतून ही आकडेवारी कमी करण्यात राज्य शासनाला बऱ्याचपैकी यश प्राप्त झाले आहे.विदर्भातील अर्भकमृत्यू(२०१५-१६)अमरावती ७०६अकोला ६८७गडचिरोली ६०९बुलडाणा ५४७गोंदिया ४६१चंद्रपूर  ४५५भंडारा  ३४६नागपूर  २९७यवतमाळ २६८वाशीम २०८वर्धा  १५२