अकोला - अकोला जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचारी मुश्ताक अली इनामदार यांनी पोलिस खात्यात उत्कृष्ट कार्य केल्यामूळे त्यांना राष्ट्रपती पदक गुरुवारी जाहीर झाले. मुश्ताक अली इनामदार १९८0 मध्ये जिल्हा पोलिस दलात रुजू झाले असून, त्यांनी सिटी कोतवाली, हायवे पोलिस, मंगरुळपीर, रामदास पेठ पोलिस स्टेशन अशा विविध पोलिस ठाण्यांमध्ये कार्य केले आहे. सद्यहस्थतीत ते जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असून, यापूर्वी त्यांना पोलिस महासंचालकांद्वारे देण्यात येणारा ह्यइग्निसियाह्ण पुरस्कारही देण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी मुश्ताक अली इनामदार यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचे जिल्हा पोलिस दलातर्फे कौतुक करण्यात आले आहे.
पोलिस कर्मचारी मुश्ताक इनामदार यांना राष्ट्रपती पदक
By admin | Updated: August 15, 2014 01:41 IST