शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्याच्या सव्वाशे कोटीच्या ‘डीपीआर’चे सादरीकरण

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

दुसरा टप्पा : कामासाठी केंद्राकडे निधी मागणार

कोल्हापूर : राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यातील १२५ कोटींच्या निधीचे वेध महापालिकेला लागले आहेत. खासगी कंपनीने केलेल्या सविस्तर विकास आराखड्याचे मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यापुढे सादरीकरण झाले. केंद्राकडे लवकरच या निधीची मागणी केली जाणार आहे.संवर्धन योजनेतून पहिल्या टप्प्यात रंकाळ्यासाठी आलेल्या निधीतून साडेचार कोटी रुपयांची तांबट कमान ते रंकाळा टॉवरपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम चार वर्षांनंतर पूर्ण झाले. अद्याप निसर्गकेंद्र प्राथमिक अवस्थेत आहेत. गाळाचे परीक्षण पूर्ण झाले असले तरी तो काढण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविली गेली नाही. रंकाळ्यात शाम सोसायटी, देशमुख कॉलनी, सरनाईक कॉलनी, आदी नाल्यांतून सांडपाणी अजूनही थेट रंकाळ्यात मिसळते. रंकाळा जलशुद्धिकरण, निर्माल्य कुंडाचे बांधकाम, ओव्हर फ्लो कमान, आदी कामे वगळता एकही भरीव काम पहिल्या टप्प्यात झाले नाही. साडेआठ कोटी खर्च करूनही रंकाळ्याच्या दुखण्यात कसूभरही फरक पडलेला नसल्याचे चित्र असताना आता प्रशासनास सव्वाशे कोटी रुपयांच्या निधीचे वेध लागले आहेत.दुसऱ्या टप्प्यातील ड्रेनेजलाईन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, संरक्षण कठड्यांची उंची वाढविणे, गाळ काढणे किंवा स्थूल ठेवण्यासाठी उपाययोजना, निर्गत पाण्याच्या व्हॉल्वची दुरुस्ती, पदपथ, सांडपाणी रोखणे, रंकाळ्याचे मजबुतीकरण करणे, आदींसाठी तब्बल राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून तब्बल १२५ कोटींचा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या सादरीकरणावेळी उपायुक्त विजय खोराटे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, इस्टेट आॅफिसर संजय भोसले, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, उपअभियंता एस. बी. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) रंकाळ्याचे संपूर्ण संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.  दर तीन महिन्याला रंकाळ्याच्या पाण्यात जंतुसंसर्ग, पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी, आदी व्याधी जडतात. मूळ दुखणे सोडून डागडुजी करण्याकडेच प्रशासनाचा कल आहे.राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून पाहिजे तितका निधी रंकाळ्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.

मागील पहिल्या टप्प्यातील कामाचा हिशेब केंद्र शासनास सादर केल्यानंतरच येत्या सहा महिन्यांत हा निधी पालिकेला मिळण्याची शक्यता आहे.तांबट कमान ते टॉवरपर्यत पाईपलाईन टाकण्याचे चार वर्षांनीकाम पूर्णसाडेआठ कोटी खर्च करुनही रंकाळ्याच्या दुखण्यात कसूभरही फरक पडलेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा तयार केला आहे.