शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अंगारकीसाठी सिद्धिविनायक मंदिर सज्ज

By admin | Updated: June 11, 2017 03:35 IST

दादर-प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर १३ जूनच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सज्ज झाले आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दादर-प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर १३ जूनच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सज्ज झाले आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला व पुरुष भाविकांसाठी मुखदर्शन आणि दुरून दर्शनासाठी एस. के. बोले मार्गावरील आगर बाजार ते सिद्धी प्रवेशद्वारादरम्यान उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून भाविकांना मंदिर प्रवेशद्वार क्रमांक १ मधून प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पुरुष आणि महिला भाविकांसाठी वेगवेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरुष भाविकांना शंकर घाणेकर मार्ग-सयानी रोडवरील रवींद्र नाट्यमंदिर येथील पदपथावरील रेलिंगमधून नर्दुल्ला टँक मैदानातील मंडपामधून मंदिरात प्रवेश दिला जाईल. महिलांना शंकर घाणेकर मार्ग - काकासाहेब गाडगीळ मार्गावरील कॉन्व्हेंट हायस्कूलच्या समोर उभारण्यात आलेल्या रेलिंगमधून रिद्धी चेकपोस्टमधून श्रींच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.मोफत वातानुकूलित बस सेवान्यासातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १२ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून १३ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत दादर येथील कबुतरखाना ते रवींद्र नाट्यमंदिर यादरम्यान मोफत वातानुकूलित बस सेवा देण्यात येईल.भाविकांसाठी सूचना- सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी येताना सोबत मौल्यवान वस्तू नेऊ नयेत.- भाविकांनी सोबत लॅपटॉप, कॅमेरे व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेऊ नयेत.- फराळाकरिता धातूचे डबे न आणता प्लास्टीकचे डबे न्यावेत.‘श्री’च्या दर्शनाच्या वेळा- सोमवार १२ जून, मध्यरात्री १:३० ते पहाटे ३:१५ वाजेपर्यंत- पहाटे ३:५० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत- रात्रौ १०:३० ते रात्रौ १२ वाजेपर्यंत