शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना उमेदवारांची पहिली यादी तयार

By admin | Updated: January 24, 2017 22:56 IST

अकोला:महापालिका निवडणुकीत मित्र पक्ष भाजपासोबत युती करण्यापूर्वीच शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे.

अंतिम निर्णयासाठी ‘मातोश्री’वर पाठवणारअकोला:महापालिका निवडणुकीत मित्र पक्ष भाजपासोबत युती करण्यापूर्वीच शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे. पहिल्या यादीला थेट ‘मातोश्री’वरून मंजूरी मिळाल्यानंतर दुसरी यादी मुंबईकडे पाठविल्या जाईल. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख पहिली यादी घेऊन बुधवारी किंवा गुरुवारी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. मोठ्या अभिमानाने खांद्यावर पक्षाचा झेंडा मिरवणाऱ्या राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांनी मनपाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, म्हणून त्या-त्या पक्षाकडे रेटा लावला आहे. मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांचा पक्षातील वजनदार नेते, पदाधिकाऱ्यांच्या घरी जाण्याचा ‘सिलसिला’सुरु झाला आहे. २७ जानेवारी पासून नामनिर्देशन पत्र सादर करावे लागणार असल्याने कोणता राजकीय पक्ष उमेदवारांची यादी प्रकाशित करतो,याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबईसह राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे गुऱ्हाळ सुरु असतानाच राज्यासह महापालिकेत सत्तेत वाटेकरी असणाऱ्या शिवसेनेने दहा प्रभागांमधील उमेदवारांची पहिली यादी तयार केली आहे. पहिल्या यादीला अंतिम मंजूरी ‘मातोश्री’वरून दिली जाईल. त्यानंतर उर्वरित प्रभागांसाठी दुसरी यादी मुंबईकडे सादर केली जाईल. त्याठिकाणी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेनेचे पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यादीला मंजूरी देतील. पहिली यादी घेऊन जिल्हाप्रमुख नितीन देशमुख मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे. ---------कुटनिती करणाऱ्यांचे पत्ते कट!शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया,माजी आ.संजय गावंडे, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर यांनी उमेदवारांची पहिली यादी तयार केली. पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महापालिकेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी अनेक शिवसैनिकांना संधी उपलब्ध करून दिली. त्याऐवजी संबंधितांनी पक्षाच्या ध्येयधोरणाकडे दुर्लक्ष करून पक्षांतर्गत कुरघोडीला प्राधान्य दिल्याचे स्थानिक नेत्यांच्या निदर्शनास आले. निष्ठावान शिवसैनिकांसोबत कुटनिती करणाऱ्यांचे पत्ते कट करण्यात आल्याची माहिती आहे.