शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हाउसिंग सोसायट्या, शाळांमध्ये होमगार्डस्; प्रस्ताव तयार करा, गृहराज्यमंत्री भोयर यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:05 IST

या निर्णयाचा दुहेरी फायदा होईल. एकतर हाउसिंग सोसायट्या, शाळा आणि अन्य ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची एक विश्वासार्हता असेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील हाउसिंग सोसायट्या, शाळा व अन्य काही सरकारी कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून गृहरक्षकांची (होमगार्ड) नियुक्ती करण्याची बाब विचाराधीन आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.

भोयर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, हाउसिंग सोसायट्या, शाळांच्या सुरक्षेचा विषय गंभीर बनला आहे. काही ठिकाणी सुरक्षा रक्षकच चुकीच्या कामांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. अशावेळी सुरक्षेची यंत्रणा विश्वासार्ह असावी, यासाठी होमगार्डनाच सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्याचा विचार समोर आला आहे. राज्यात ४८ हजार होमगार्डस् आहेत. ते गृहविभागाच्या नियमित सेवेमध्ये नसतात. त्यांची सेवा महिन्यातून जितके दिवस घेतली जाते तितक्या दिवसांचे मानधन त्यांना दिले जाते. सध्या हे मानधन दरदिवशी १,२८३ रुपये इतके आहे. त्यांना महिन्यातील काहीच दिवस काम मिळते. सण-उत्सवांच्या काळात (गणेशोत्सव, नवरात्र आदी) त्यांना तुलनेने अधिक दिवस काम मिळते. 

राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की, सुरक्षा रक्षक म्हणून होमगार्डसना नेमण्याचा निर्णय झाला तर त्यांना मासिक मानधन किती असावे, याचे स्वरूप निश्चित केले जाईल. या निर्णयाचा दुहेरी फायदा होईल. एकतर हाउसिंग सोसायट्या, शाळा आणि अन्य ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेची एक विश्वासार्हता असेल.

तीन वर्षांनी नूतनीकरण

  • पोलिस दलाला अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी साहाय्य करणे हे होमगार्डचे कर्तव्य असते. होमगार्डसना सनद क्रमांक दिला जातो आणि दर तीन वर्षांनी त्याचे नूतनीकरण केले जाते.
  • जितक्या दिवसांसाठी त्यांना काम देण्यात आले होते, त्याच्या किमान ५० दिवस त्यांनी ड्यूटी केलेली असेल तरच पुढील तीन वर्षांसाठी नूतनीकरण केले जाते.
टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयरministerमंत्री