राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी

By admin | Published: July 29, 2016 06:59 PM2016-07-29T18:59:37+5:302016-07-29T18:59:37+5:30

पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून ग्रामीण लोकसंख्येचे निश्चितीकरण करण्यात आले आहेत

Preparations for the elections of 27 Zilla Parishads in the state | राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी

राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी

Next

अरुण बारसकर
सोलापूर, दि. २९ : पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून ग्रामीण लोकसंख्येचे निश्चितीकरण करण्यात आले आहेत. नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका तसेच महानगरपालिकेत समावेश झालेली गावे वगळूण २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या अंतिम केली आहे.

२०१७ मध्ये राज्यातील २७ जिल्हा परिषदांची मुदत संपत आहे. या जिल्हा परिषदांच्या निवडणुका या २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहेत. मागील निवडणुकीसाठी २००१ च्या जनगणनेनुसार गट व गण पाडले होते. आता या २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेचा विचार होणार आहे. राज्य निवडणुक आयोगाने २१ जून च्या पत्रानुसार मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा व गोंदिया हे जिल्हा गवळूण निवडणुकाची तयारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये समावेश झालेली गावे वगळूण लोकसंख्येचे निश्चितीकरण केले आहे.

आता पुढील टप्पा हा मतदार याद्या तयार करणे व गट व गण पाडण्याचा राहणार आहे. हे कामही आॅगस्ट महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले.  मागील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट व गणाचे निश्चितीकरण करताना एक जिल्हा परिषद गटाची लोकसंख्या ३५ ते ४० इतकी गृहीत धरली होती. याला आदिवाशी भाग अपवाद होता. याही निवडणुकीसाठी हाच नियम लावला तर राज्यातील काही जिल्हा परिषदांसाठी गटांची संख्या वाढण्याची शक्यता आहे,

मोहोळ, माढा, माळशिरस वगळले
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा व माळशिरस या ठिकाणी नगरपालिका स्थापन झाल्याने ही गावे जिल्हा परिषद गटातून वगळली आहेत. माढ्याची ११ हजार २७, मोहोळची २७हजार ८३३ व माळशिरसची २१ हजार ८४५ अशी २०११ च्या जनगणनेनुसार ६० हजार ८४५ लोकसंख्या जि.प. गटातून वगळली आहे.

मागासवर्गीयांची संख्या साडेचार लाख
सोलापूर जिल्ह्याची(११ तालुक्यांची फक्त ग्रामीण भागाची) २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या २९ लाख २२ हजार २२१ इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे चार लाख ४६ हजार १०३ तर जमातीचे ४९ हजार ३८७ लोक आहेत.
तालुका                लोकसंख्या           जाती              जमाती
द.सोलापूर           २,६०,८९७            ३५,१५१           ११,७८७
उ.सोलापूर             १,०५,७९४            १७,१२३          २३६५
अक्कलकोट            २,५०,८९०           ४१,०४५          ८८८०
बार्शी                    २,५३,९८९            ३२२४७               ३२७९
माढा                    २,९०,५३७            ३८,९८१             २०४४
मोहोळ                  २,४९,०८७             ३७,८६०              ३१९९
मंगळवेढा               १,८४,१०८              २८,७५५             १२८६
माळशिरस              ४,६३,६६०             ८४,७६७             ३८५३
करमाळा               २,३१,२९०                ३१,६८२            ३८९६
सांगोला                २,८८,५२४                 ४२.५१९            १८४५
एकूण                   २९,२२,२२१                ४,४६,१०३       ४९,३८७

Web Title: Preparations for the elections of 27 Zilla Parishads in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.