शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मंडळाकडून इयत्ता दहावीच्या निकालाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 09:28 IST

गुण पाठविण्याबाबतचा आराखडा होणार प्रसिद्ध

पुणे : राज्य शासनाने दहावीच्या निकालाची मूल्यांकन पद्धती जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शाळांनी राज्य मंडळाला कोणत्या स्वरूपात गुण पाठवावेत, यासंदर्भातील आराखडा दि. १ जून रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापकांना इयत्ता नववी व दहावीतील विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करावे लागणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच दहावीचा निकाल इयत्ता नववीमधील गुण आणि शाळास्तरावर इयत्ता दहावीत घेतलेल्या विविध परीक्षांच्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचे अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले. त्यानुसार राज्य मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.‌ प्रत्येक विद्यार्थ्याने विविध परीक्षांमध्ये प्राप्त केलेले गुण शाळांकडून राज्य मंडळ मागविणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण शाळांनी कोणत्या स्वरूपात भरून पाठवावेत याबाबतचा आराखडा राज्य मंडळाकडून तयार केला जात आहे.इयत्ता दहावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळांनी कोणत्या स्वरूपात राज्य मंडळाला गुण पाठवावेत याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या मंगळवारी यासंदर्भातील आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानुसार राज्य मंडळाकडे शाळांनी गुण पाठविणे आवश्यक आहे.- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी परीक्षेस नोंदणी केलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची संख्याएकूण विद्यार्थी :    १६ लाख २०६मुले :     ८ लाख ६६ हजार ५७२मुली :     ७ लाख ३३ हजार ५३२ट्रान्सजेंडर :     १०२