शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

भाजपचे प्रवीण पोटे यांचा विक्रमी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:02 IST

१२८ मते असलेल्या काँग्रेस पक्षाला खरे तर मित्रपक्षांच्या मदतीने विजयासाठी आवश्यक असलेला २३८ मतांचा जादुई आकडा गाठणे अशक्य नव्हते

अमरावती : राज्यभरातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावणारा निकाल अमरावती मतदारसंघाचा आहे. त्यासाठीची आकर्षणे दोन - एकूण वैध मतदानाच्या ९६.४२ टक्के विक्रमी मते घेऊन अमरावतीचे पालकमंत्री असलेल्या भाजपक्षाच्या प्रवीण पोटे यांनी ऐतिहासिक विजय संपादन करणे आणि एकूण ४८९ मतांपैकी १२८ मतसामर्थ्य असलेला काँग्रेस पक्ष अवघी १७ मते मिळून भाजपच्या दावणीला बांधला जाणे!येथे भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होती. १२८ मते असलेल्या काँग्रेस पक्षाला खरे तर मित्रपक्षांच्या मदतीने विजयासाठी आवश्यक असलेला २३८ मतांचा जादुई आकडा गाठणे अशक्य नव्हते; तथापि काँग्रेस पक्षाला अखेरपर्यंत उमेदवारच सापडला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना, 'मिळाला काय उमेदवार?' असे फोन पक्षाच्या राज्य प्रमुखांकडून स्थानिक नेत्यांना दिवसाआड येत होते. राज्य पातळीवर उमेदवार मिळत नाही; स्थानिक पातळीवर कसा मिळणार, अशी नाराजी स्थानिक नेत्यांची होती. अखेरच्या टप्प्यात काँग्रेसने स्थानिक व्यावसायिक अनिल माधोगडिया यांना धरून बांधून मैदानात उतरविले आणि त्याचवेळी काँग्रेसचा पराभव निश्चित झाला.भाजपचे प्रवीण पोटे पाटील हे राज्यमंत्री असूनही चार महिन्यांपासून मंत्रालयात गेले नाहीत, इतकी त्यांनी मतदारसंघावर अढळ नजर ठेवली. दिवाळीपासून 'कामी' लागलेले पोटे, पाटील विरोधकांचा कुठलाही डाव उलथवून लावण्यासाठी अगदी सज्ज होते. काँग्रेस ऐनवेळी तगडा उमेदवार देईल नि आमचा 'भाव वधारेल', अशी आशा मतदारांना होती. परंतु काँग्रेसने 'निरुत्साही' उमेदवार दिल्याने स्पर्धाच निर्माण झाली नाही. पोटे यांना विरोध करणाऱ्या आमदार रवि राणा (युवा स्वाभिमान) यांना मुख्यमंत्र्यांनी शांत केले. विरोधकच न उरल्याने ४७५ वैध मतांपैकी पोटे यांनी ४५८ मते मिळविली. १३ मते बाद ठरली. एक मत न्यायालयाने गोठविले.अमरावती मतदारसंघकाँग्रेसची १७ मते वगळता इतर सर्वच मते पोटे यांनी स्वत:कडे वळविली. सर्वच विरोधी पक्षांची मते फुटली. मताधिक्याचा हा राज्यातील विक्रमच होय. 'सर्वांना चालणारा उमेदवार' या पोटे पाटील यांच्या छबीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

टॅग्स :Pravin Poteप्रवीण पोटेBJPभाजपा