शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

माढ्यातून प्रवीण गायकवाड लढणार? शरद पवार यांची नवी खेळी!

By पोपट केशव पवार | Updated: April 1, 2024 10:57 IST

Lok Sabha Election 2024 : रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबते होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर : भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते-पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी अद्यापही राजी नसल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून या मतदारसंघातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांना मैदानात उतरवण्याची नवी खेळी खेळली जात आहे. 

रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी यावर खलबते होऊन गायकवाड यांना तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे माढा मतदारसंघात प्रवीण गायकवाड विरुद्ध भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या उमेदवारीला विरोध करत अकलूजच्या मोहिते-पाटील यांनी कडाडून विरोध करत बंडाचे हत्यार उपसले आहे. यातूनच मोहिते-पाटील हे शरद पवार गटाच्या गळाला लागले होते. 

यासाठी तुतारी हातात घेण्याची तयारीही त्यांनी चालविली होती. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत सलगपणे मोहिते-पाटील परिवारातील सदस्यांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन केल्याचे समजते. त्यामुळे ऐनवेळी महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी शरद पवार यांनी त्यांचे विश्वासू सहकारी प्रवीण गायकवाड यांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आली. स्वत: गायकवाड यांनीही लढण्यास सहमती दर्शविली आहे.  गायकवाड हे पुण्यातील असले तरी त्यांची माळशिरस तालुक्यात शेती, घर आहे. त्यामुळे या मतदारसंघाशी त्यांचा चांगला जनसंपर्कही आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना उद्यमशील बनवण्यासाठी मोठी चळवळ सुरु केली आहे.                मोहिते पाटील यांचे या मतदारसंघात मोठे काम आहे. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून लढावे ही आमची इच्छा आहे. मात्र, ते लढणार नसतील तर मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. तशी इच्छा मी शरद पवार यांना भेटून कळवली आहे - प्रवीण गायकवाड, इच्छुक उमेदवार, माढा लोकसभा मतदारसंघ. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sharad Pawarशरद पवार