शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांची 'स्ट्रॅटेजी' आदित्य ठाकरेंनाही बनवणार मुख्यमंत्री ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 17:56 IST

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.

मुंबई - २०१४ लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर राजकीय रणनितीकार म्हणून प्रशांत किशोर प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र अमित शाह यांच्या उदयानंतर किशोर यांना भाजपपासून वेगळं व्हावं लागलं. परंतु, भाजप सोडल्यानंतर प्रशांत किशोर यांचा राजकीय रणनितीकार म्हणून उदय झाला. त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री असून किशोर आता शिवसेनेचे राजकीय रणनितीकार आहेत. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पूर्वीच्या आणि आताच्या शिवसेना पक्षात अनेक बदल दिसून येत आहेत. हा बदल प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीमुळेच झाल्याची टीका विरोधक करतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच पक्षाची स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी राजकीय विशेषज्ञ म्हणून प्रशांत किशोर यांना नियुक्त केले होते. त्यानुसारच आता शिवसेनेचे काम सुरू असल्याचे समजते.

प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसाठी रणनिती आखली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेना लढवत असलेल्या मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करून विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा उभी केली. तिच यंत्रणा आता प्रत्यक्षात शिवसेनेसाठी काम करत आहे.

दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी आणि युवकांशी संवाद साधला आहे. याच यात्रेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. आदित्य यांची जन आशीर्वाद यात्रा किशोर यांच्या सांगण्यावरून असल्याचे समजते.

याआधी प्रशांत किशोर यांची स्ट्रॅटेजी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांना आणि आंध्रप्रदेशात जगमोहन रेड्डी यांना फायदेशीर ठरली. नितीश आणि जगमोहन हे दोघेही आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता टिकविण्यासाठी किशोर काम करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच किशोर यांचा करिष्मा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फायदेशीर ठरणार का, हे येणारा काळच सांगेल.