शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 14:08 IST

Prasad Lad : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा आणि प्रसाद लाड यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने करण्यात आली. यानंतर सर्वच स्तरातून या सर्वांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. टीकेची झोड उठवण्यात आल्यानंतर प्रसाद लाड बॅकफुटवर गेले आहेत. आज पुन्हा एकदा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात ते बोलत होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत. याचबरोबर, माझा कुठलाही दुसरा हेतू नाही, आपण कोकणात वाढलेली पोरं आहोत, याचमुळे हा कोकण महोत्सव आपण आयोजित करत आहोत. सर्वांना एकत्र घेऊन आम्ही कोकणासाठी काम करत आहोत. मागच्या अडीच वर्षात कोकणाला कॅलिफोर्निया करू असे पर्यावरण मंत्री म्हणाले होते. पण ते साधे कोकणात देखील आले नाहीत, असा टोला देखील प्रसाद लाड यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांना लागला आहे.

या कोकण महोत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. ते म्हणाले की, काही लोकांना कोकणाचा विकास नको. त्यांना कोकणाला मागास ठेवायचे आहे. जेणेकरून त्यांना भावना भडकावून राजकारण करता येईल. पण आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे. त्यामुळे आम्ही कोकणात रिफायनरी करूनच दाखवू, असे ठाम मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच, कोकणाच्या विकासासाठी काजू, सुपारी आणि नारळ उत्पादक आणि पर्यटनाच्या विकासासाठी अधिक चांगल्या योजना सुरु केल्या जातील. हे काम आणखी पुढच्या टप्प्यात नेण्याचे काम राज्य सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

या आधी काय म्हणाले होते प्रसाद लाड?गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी या महोत्सवाची माहिती देताना त्यांनी शिवरायांच्या जन्मस्थळाविषयी चुकीचे विधान केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान त्यांनी केले. स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचाराल... पण हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणाले. दरम्यान, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या व्यक्तींनी केला. महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, असे त्यांनी म्हटले. त्यावर आपलं वाक्य करेक्ट न करताच सारवासारव करताना शिवरायांचे बालपण रायगडावर गेले, असे प्रसाद लाड म्हणाले. छत्रपती शिवरायांनी रायगडावरच स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथूनच त्यांच्या शौर्याची सुरुवात झाली, असेही प्रसाद लाड म्हणाले होते.

टॅग्स :Prasad Ladप्रसाद लाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस