लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सिडको परिसरातील हनुमान चौकात राहणारे अनिल भुजबळ यांचा विजप्रवाहचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. रविवारी (दि.१२) रात्री जेवणानंतर त्यांचा मुलगा घरातून बाहेर आला असता घरासमोर असलेल्या एका विद्यूत खांबाच्या तारेला त्याने धरले. यावेळी संततधार पावसामुळे तारेमध्ये वीजप्रवाह उतरला होता. यामुळे अरिहंतला धक्का लागला सदर बाब त्याच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून त्वरित अरिहंतला बाजूला ओढले मात्र यावेळी वीजप्रवाहचा जोरदार झटका भुजबळ यांना बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रविवारी (दि. ११) सायंकाळपासूनच सिडको भागात संततधार पाऊस सुरू होता. त्याने घरासमोरच असलेल्या विदयुत खांबाला आधारासाठी लावलेल्या तारेला हात लावला. मात्र दुर्देवाने या तारेमध्ये देखील वीजप्रवाह उतरला होता. यावेळी अरिहंतला धक्का बसल्याचे लक्षात आल्यानंतर वडीलांनी धाडसाने त्याला बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तेदेखील विजप्रवाहच्या धक्क्याने घराच्या लोखंडी जिन्यापर्यंत फेकले गेले. या जिन्यातही वीजप्रवाह उतरला असल्याने त्यांचा भाऊ संतोष यांनी अनिल यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना त्वरित परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी अनिल भुजबळ यांना मयत घोषित केले.
मुलाचा जीव वाचवताना वडिलांनी गमाविले प्राण
By admin | Updated: June 12, 2017 17:46 IST