शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांकडून आंबेडकरी विचारांना तिलांजली, सुशीलकुमार शिंदे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 16:53 IST

माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली.

सोलापूर - माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. '' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली. मात्र डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे,'' असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. तसेच ही आपली शेवटची निवडणूक आहे, असे सांगत सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमधील मतदारांना भावूक आवाहन केले. सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली. मात्र डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे. प्रकाश आंबेडकर हे सेक्युलर मतांची विभागणी करण्यासाठी सोडलेले भाजपाचे पिल्लू आहे.'' असा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. यावेळी सत्ताधारी भाजपाचाही शिंदे यांनी सत्ताधारी भाजपावरही टीका केली. भाजपाने सोलापूरमध्ये एकतरी प्रकल्प आणला आहे का, असा सवाल शिंदे यांनी विचारला. तसेच केवळ जातीय समीकरणे डोळ्यांसमोर ठेवून भाजपाकडून जयसिद्धेश्वर स्वामी यांनी उमेदवारी देण्यात आली असे, शिंदे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्हिजन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे सोलापूरमध्ये आले होते तेव्हा येथील कापड उद्योगाबाबत भरभरून बोलले होते. मात्र या उद्योगाची भरभराट व्हावी यासाठी त्यांनी काय केले? मोदींनी पाच वर्षांत  येथील एक मीटर तरी कापड खरेदी केले आहे का?  असा सवालही त्यांनी विचारला.  

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेsolapur-pcसोलापूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक