अकोला : महापालिका, नगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी सोपविली आहे. पटेल यांच्याकडे विदर्भाच्या समन्वयक पदाची धुरा देण्यात आली असून, माजी मंत्री राजेश टोपे यांची प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष कामाला लागलाआहे. शरद पवार यांनी दोन आठवड्यांपूर्वी नागपूर व अमरावती येथे कार्यकर्त्यांसोबत हितगूज करून, त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे अकोला मनपासाठी प्रभारी म्हणून,तर यवतमाळचे आमदार संजय बाजोरिया यांची पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी
By admin | Updated: October 19, 2016 05:39 IST