शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

प्रज्ञा पाटील यांचा सलग 103 तास योगासनं करण्याचा विश्वविक्रम

By admin | Updated: June 20, 2017 16:35 IST

गेल्या काही वर्षांपासून योगासनाला वाहून घेतलेल्या नाशिक येथील प्रज्ञा पाटील यांनी तब्बल १०३ तास सलगपणे योगासने करून विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 20-   शरीराबरोबर मनाचाही व्यायाम होणं गरजेचे असून यासाठी योगासनं करणं हे उत्तम साधन असल्याने गेल्या काही वर्षांपासून योगासनाला वाहून घेतलेल्या नाशिक येथील प्रज्ञा पाटील यांनी तब्बल १०३ तास सलगपणे योगासने करून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता सलग योगासनांचं १०३ तासाचं काऊंटडाऊन संपल्यानंतर उपस्थित योगाप्रेमीनी एकच जल्लोष केला.

इगतपुरीजवळील पिंप्री सदो या गावानजीक हा विश्वविक्रम नोंदविण्यात आला.नाशिकच्या 48 वर्षीय योगाशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सतत १०० तास योगा करून एक नवा इतिहास रचण्याचा संकल्प केला होता.यानुसार शुक्रवार दिनांक १६ जून रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांनी या योगा मॅरेथॉनला आरंभ केला. योगासनांची विविध आसने करीत त्यांनी रविवार दिनांक १८ रोजी दुपारी दीड वाजता तामिळनाडूच्या के.पी.रचना यांचा ५७ तासाचा विक्रम मोडीत काढीत डॉ. व्ही.गणेशकरण यांचाही ६९ तासाचा विक्रम त्याच दिवशी मोडीत काढला.मात्र त्या यावरच न थांबता त्या संकल्पानुसार सलगपणे योगासने करीत राहिल्या.दरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता त्यांनी सलग योगासनांचे शंभर तास पार केले.मात्र तरीही न थांबता त्यांनी १०३ तासाचा विक्रम पूर्ण करीत आपल्या या  विक्रमाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकोर्ड नोंद केली. यावेळी गिनीज बुकचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं.

यावेळी आमदार देवयानी फरांदे,प्रा.डॉ.मीनाक्षी गवळी,उद्योजक अविनाश गोठी, रोहिणी नायडू भाजपाच्या शहर उपाध्यक्ष सोनल दगडे,संध्या शिरसाट,मनोरमा पाटील,दीपाली गवांदे,अश्विनी डोंगरे,मीनाक्षी अहेर,वंदना रकीबे,गौरव पाटील,गौरागी पाटील आदी उपस्थित होते."शरीराबरोबर मनाचाही व्यायाम होणाऱ्या योगसाधनेला जागतिक किर्ती मिळावी आणि नाशिक जिल्ह्याची जागतिक स्तरावर नवी ओळख व्हावी, यासाठी आपण शंभर तास योगा करण्याचा संकल्प केला होता.संकल्प जरी केला तरी गंभीर आव्हान माझ्यापुढे उभे राहिले होते. ज्या वयात माणसाला शरीर साथ देत नाही त्या वयात सलगपणे योगासने करणे म्हणजे एक आव्हानच होते.मात्र योगाप्रेमी आणि कुटुंबातील सदस्य,आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या धैर्यामुळे हा विक्रम करणे शक्य झालं," असं मत प्रज्ञा पाटील यांनी व्यक्त केलं आहे.