शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

प्रदीप पटवर्धन यांना आवडायचे जळगावचे पायनापल श्रीखंड अन् शेवभाजी, जळगावकरांनी जागवल्या आठवणी

By अमित महाबळ | Updated: August 9, 2022 16:48 IST

Pradeep Patwardhan:

- अमित महाबळ जळगाव - जुन्या काळातील लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांची एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. प्रदीप पटवर्धन यांचे जळगावमध्ये अनेक नाट्यप्रयोग झाले. त्यांना नेहमीच रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; मात्र आणखी एका गोष्टीसाठी ते जळगावच्या प्रेमात पडले होते, ते म्हणजे पायनापल श्रीखंड आणि शेवभाजी.

नवी पेठेतील रहिवासी व सध्या पुण्याला स्थायिक झालेले विजय भांगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रदीप पटवर्धन यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. प्रदीप पटवर्धन यांची ‘मोरुची मावशी’ या नाटकातील भूमिका अतिशय गाजली. या भूमिकेमुळे त्यांचे सर्वत्र नाव झाले. या नाटकाच्या दौऱ्यातला प्रयोग जळगावला बालगंधर्व खुले नाट्यगृहात लावला होता. लोकांनी अक्षरश: रांगा लावून तिकिटे खरेदी केली. त्या दिवशी थिएटर बंद होते. नाटकासाठी झालेली रसिक प्रेक्षकांची तुफान गर्दी पाहून पोलीस ठाण्याचे तेव्हाचे प्रभारी अधिकारी गर्गे हे देखील आश्चर्यचकित झाले होते. अर्थातच जळगावमधील हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला.

काका, श्रीखंड घेऊन याप्रदीप पटवर्धन यांना जळगावचे पायनापल श्रीखंड आणि शेवभाजी हे दोन्ही पदार्थ मनापासून आवडायचे. त्यामुळे कुठेही भेट झाली म्हणजे काका, तुमच्या जळगावचे श्रीखंड घेऊन या, अशी आठवण ते हमखास काढत. काही वर्षांपूर्वी एका पतसंस्थेच्या नवीन शाखेचा शुभारंभ चोपडा शहरात झाला होता. त्या कार्यक्रमासाठी प्रदीप पटवर्धन आले होते. त्यांनी नाटकातले काही संवाद त्यावेळी म्हणून दाखवले होते.

साडी खरेदी जळगावातूनजळगाव महापालिका शेजारील गल्लीत एक सायकल दुकान होते. त्याच्या बाजूला साडीचे दुकान नवीनच सुरू झाले होते. प्रदीप पटवर्धन या दुकानातून साडी खरेदी करायचे. त्यांनी बँकेतील नोकरी सांभाळून अभिनय केला, अशीही आठवण विजय भांगले यांनी सांगितली.

टॅग्स :Jalgaonजळगाव