शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
3
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
4
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
5
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
6
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
7
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
8
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
9
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
10
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
11
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
12
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
13
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
14
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
16
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
17
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
18
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
19
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
20
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!

भोंदूगिरीला प्रबोधनकारांनी लाथाच घातल्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 10:36 IST

प्रबोधन या नियतकालिकातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रहाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे हे नास्तिक नव्हते; पण समाजातील भोंदूगिरीला त्यांनी नेहमीच लाथा घातल्या. कर्मकांडाला त्यांनी नेहमीच विरोध केला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केले. प्रबोधन या नियतकालिकातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रहाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई प्रामुख्याने उपस्थित होते.  मुख्यमंत्री म्हणाले की, धर्माबद्दल अभिमान असलाच पाहिजे; पण धर्म घरी ठेवा आणि बाहेर राष्ट्र हाच तुमचा धर्म ही शिकवण आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्हाला मिळाली. ‘मतांच्या राजकारणाचा विचार न करता बोलले गेले तर अनेक प्रश्न सुटतील, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. तो धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, मत मिळाले नाही तरी चालेल; पण समाजाच्या हिताचे बोलण्याचे धाडस हे केलेच पाहिजे, हिंमत दाखविलीच पाहिजे. यावेळी राज्यमंत्री विश्वजित कदम, खा. अरविंद सावंत, साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आ. मंगलप्रभात लोढा, महापौर किशोरी पेडणेकर, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदी उपस्थित होते. सुभाष देसाई यांचेही भाषण झाले.  या ग्रंथाचे संपादक पत्रकार सचिन परब यांनी प्रास्ताविक केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वेबसाइटचे प्रकाशन  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. माझा पक्षच पितृपक्ष पितृपक्षात चांगले काम करू नये, असे म्हणतात. पण माझा तर पक्षच पितृपक्ष आहे, माझ्या वडिलांनी तो स्थापन केलेला आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हणताच हशा पिकला.  शेंडी, जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असेही ते म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे