शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करा : शिक्षकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 06:16 IST

जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग तातडीने मंजूर करावा अशा अनेक मागण्या शिक्षकांनी केल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे १२वे द्वैवार्षिक अधिवेशन यंदा मुंबईत आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई : जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग तातडीने मंजूर करावा अशा अनेक मागण्या शिक्षकांनी केल्या. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे १२वे द्वैवार्षिक अधिवेशन यंदा मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. रविवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. या दोन दिवसीय अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने शिक्षकांचे प्रश्न मांडण्यात आले.मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षक विविध कारणांनी त्रस्त आहेत. अशैक्षणिक कामे, वेतन, निवृत्तिवेतन वेळेवर न मिळणे, सोईसुविधा उपलब्ध नसणे यामुळे शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व प्रश्नांवर ऊहापोह केला असून, लवकरच यावर तोडगा निघेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला आहे.समारोप सत्राला अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे संघटनमंत्री महेंद्र कपूर उपस्थित होते. सकाळच्या सत्रात सध्याच्या शैक्षणिक धोरणावर चर्चा झाली, तसेच कंपनी कायद्याचा परिणाम अनुदानित शाळांवर होणार असल्याने, या कायद्याला विरोध करणार असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.शिक्षकेतर कर्मचाºयांचा आकृतिबंध तत्काळ घोषित करावा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, शिक्षकांची पदे वर्ग तुकडीनिहाय मंजूर करावी, समुपदेशकांच्या प्रलंबित मागण्या मंजूर कराव्यात, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, शिक्षण क्षेत्रात कंपन्यांना शिरकाव नसावा, कला व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना एसएससी परीक्षेत बोनस गुण मिळतात. त्याच धर्तीवर राज्य व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त स्काउट व गाइड विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत बोनस गुण देण्यात यावेत, असे ठराव रविवारी शिक्षक परिषदेच्या राज्य अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

टॅग्स :Teacherशिक्षक