शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

यंत्रमाग उद्योगास लवकरच पॅकेज

By admin | Updated: August 3, 2016 03:32 IST

राज्यातील १२ लाख ५० हजार यंत्रमागांना दिलासा देणारे पॅकेज विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी दिले जाईल

मुंबई : राज्यातील १२ लाख ५० हजार यंत्रमागांना दिलासा देणारे पॅकेज विधिमंडळाचे चालू अधिवेशन संपण्यापूर्वी दिले जाईल, असे आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. सुरेश हाळवणकर यांनी यंत्रमागांच्या समस्यांसंदर्भात लक्षवेधी मांडताना महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधत यंत्रमागांच्या कर्जाचे कृषी कर्जाप्रमाणे पुनर्गठन करण्याची मागणी केली. तसेच, यंत्रमागांना सुतगिरण्यांकडून २५ टक्के सुत हे किफायतशीर दराने पुरवावे, बाजूच्या कर्नाटकप्रमाणे एक रुपया युनिट दराने वीज पुरवावी, चीनच्या कापड आयातीवर निर्बंध घालावेत, आदी मागण्या केल्या. काँग्रेसचे आसिफ शेख यांनीही याच मुद्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले. प्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार मंडळाची स्थापना तत्काळ करण्याची मागणी केली. यावर, मंत्री देशमुख यांनी सांगितले की, सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्यात येतील. त्यात कर्जाचे पुनर्गठन, वीज दर कमी करणे आदींचा समावेश असेल. सुतगिरण्यांना नफा होईल अशा पद्धतीने पण किफायतशीर दराने यंत्रमागांना सुत पुरविणारे धोरण आणले जाईल. यंत्रमाग कामगार मंडळाची स्थापना येत्या दोन महिन्यांत करण्यात येईल. अब्दुल सत्तार, राजेश टोपे, अनिल बाबर आदींनी लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)