नागपूर : वीज चोरीप्रकरणी विशेष न्यायालयाने एका आरोपीस एक वर्षे सक्तमजुरी व १ लाख ४२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शिवाजी पाटील, रा. बेलखेड, ता. उमरखेड असे त्या व्यक्तीचे नाव आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पाटील यांची बेलखेड येथे पिठाची गिरणी आहे. महावितरणचे कनिष्ठ अभियंता संजय राठोड हे तपासणीसाठी पाटील यांच्या पिठगिरणीवर गेले असता, त्यांना तेथील मीटरचे सील तुटलेले आढळून आले; शिवाय त्यातून वीजचोरी होत असल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक चौकशीत पिठगिरणी मालक पाटील यांनी एकूण ४७ हजार ४१० रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. मात्र पाटील यांनी वीजचोरी व दंडाची रक्कम भरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर पुसद येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.जे. शर्मा यांनी शिवाजी पाटील यांना एक वर्ष सक्तमजुरी व १ लाख ४२ हजार रुपयांचा दंड तसेच तो दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा, असा निर्णय दिला.
वीज चोरी करणाऱ्यास सक्तमजुरी
By admin | Updated: July 21, 2016 21:13 IST