शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वीज सेन्सर सेंटरमुळे आपत्तीचा सामना करणे सोपे

By admin | Updated: June 8, 2017 03:04 IST

वीज पडण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्यातील १६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या वीज सेन्सर सेंटरचे काम चोखपणे होत आहे.

आविष्कार देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वीज पडण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्यातील १६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या वीज सेन्सर सेंटरचे काम चोखपणे होत आहे. मात्र, विविध जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वीज पडण्याआधी दोन तास सूचना मिळूनही त्यांच्याकडून पुढील काम धीम्या गतीने होते. त्यामध्ये सुधारणा झाल्यास आपत्तीचा मुकाबला करणे अधिक सोपे होणार असल्याचे मत आयआयटीएमचे (भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान संस्था) प्रकल्प संचालक डॉ.एस.डी.पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.पुण्याच्या आयआयटीएम संस्थेने पुणे, रत्नागिरी, अकोला, यवतमाळ, सोलापूर, वेंगुर्ला, लातूर, औरंगाबाद, जळगाव, चंद्रपूर, नागपूर, परभणी, नाशिक, बीड, कोल्हापूर आणि हरिहरेश्वर (रायगड) या ठिकाणी हे वीज सेन्सर सेंटर दोन वर्षांपासून उभारले आहेत. यासाठी सुमारे आठ कोटी रु पयांचा खर्च आला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळण्याचेही प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन वर्षांत वीज पडून २०० जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. ही आकडेवारी फक्त २५ जिल्ह्यातीलच आहे. जीवितहानीसह कोट्यवधी रु पयांची वित्तहानीही या आपत्तीमुळे झाली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ठिकठिकाणी ३० वीज अटकाव यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र वीज कुठे पडू शकते, वीज पडण्याचे प्रमाण का वाढले याचा अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञान बसवण्यात आले नव्हते. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेने राज्यात १६ ठिकाणी वीज सेन्सर सेंटर बसविले आहेत. वीज पडण्यापूर्वीच काही तास अगोदर वीज पडण्याचे नेमके ठिकाण एसएमएसद्वारे प्रत्येक जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविण्यात येते. त्यानंतर संबंधित आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या विभागात तो संदेश तातडीने पसरविणे आवश्यक आहे, तो मात्र त्यांच्यामार्फत वेळेत दिला जात नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले. वीज पडण्याची अर्धा ते दोन तास आधी माहिती मिळते. तीच माहिती तातडीने संबंधित विभागात दिल्यास प्रशासनाला दुर्घटना टाळणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मध्यंतरी राज्य स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्व माहिती देण्यात आली होती. कोकणातून मात्र कोणीच आले नसल्याचेही डॉ.पवार यांनी सांगितले.वीज सेन्सर बसविलेल्या ठिकाणी नेटवर्क नसणे, लाइट जाणे अशा समस्या उद्भवतात. एका वेळी किमान १० सेन्सर सेंटर सुरू असणे महत्त्वाचे आहे, तसे झाल्यास अन्य कोणत्या ठिकाणी वीज पडणार हेही समजू शकते, असेही डॉ.पवार यांनी सांगितले.>एसएमएसद्वारे देणार माहितीभारतीय हवामान विभाग आणि भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था पुणे (विज्ञान मंत्रालय) यांच्या वतीने हे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. अमेरिकेच्या वेदरबक या संस्थेने लायटनिंग लोकेशन नेटवर्क तंत्रज्ञान विकसित केले आहे, तर पोल्युशन कंट्रोल लिमिटेड या संस्थेने यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील १६ ठिकाणी यंत्रणा बसवल्यानंतर पुण्यातील आयआयटीएम संस्था त्या त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करून तेथील हवामान शास्त्रज्ञ, सहायक शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना एमएमएसद्वारे पूर्वसूचना देण्याचे काम करतात.अशी आहे यंत्रणायंत्रणेला एक अँटेना आणि युजर जोडण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान २०० ते २५० कि.मी. अंतरावरील हवामानाची स्थिती, वीज किती क्षमतेने आणि कोणत्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे याची माहिती कळवणार आहे. पुणे येथील आयआयटीएम विभागाकडून हवामानाचा अभ्यास करून वीज पडण्याच्या अर्धा ते दोन तास पूर्वी पूर्वानुमान कळवण्यात येतो.हरिहरेश्वर येथे वीज सेन्सर सेंटर रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे वीज सेन्सर सेंटर उभारण्यात आले आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग अनभिज्ञ आहे. असे कोणते सेंटर उभारले आहे, याची माहिती अथवा पत्र आले नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.