शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर

By admin | Updated: February 3, 2016 03:56 IST

माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सध्या सुरू असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांची पाठराखण केली

मुंबई : माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सध्या सुरू असलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भुजबळांची पाठराखण केली. ‘महाराष्ट्रात आजवर असे कधी घडले नव्हते,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्तवसुुली संचालनालयाने सोमवारी रात्री अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद सर्वत्र उमटले. नाशिक, बीड व मुंबई येथे समता परिषद व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या कारवाईविरुध्द उग्र आंदोलन केले. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तातडीने पत्रपरिषद घेऊन भुजबळांवरील कारवाई राजकीय हेतूने होत असल्याचा आरोप केला. भाजपाचे खासदार आमच्या नेत्यांना जेलमध्ये पाठविणार असे म्हणत आहेत. आम्ही सगळे तयार आहोत, पण चौकशी यंत्रणेच्याही पुढचे बोलण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल पवार यांनी खा.किरीट सोमय्या यांचे नाव न घेता केला.दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाबाबत जे काही निर्णय झाले ते तत्कालिन मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेले होते. ही उपसमिती मंत्रिमंडळाने नेमलेली असते. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने समिती नेमली जाते. उपसमितीचे निर्णय हे सरकारचे असतात आणि सरकारच्या निर्णयांची चौकशी होऊ शकत नाही, असा दावा पवार यांनी एका प्रश्नात केला. (विशेष प्रतिनिधी)भुजबळप्रश्नी आंदोलन नाहीभुजबळांच्या समर्थनार्थ आपला पक्ष रस्त्यावर उतरणार का, असे विचारले असता, हा मुद्दा रस्त्यावरील आंदोलनाचा नाही. राज्यातील सामान्य माणसाशी संबंधित अनेक गंभीर विषय यापेक्षा आहेत, असे सांगत त्यांनी बगल दिली.तो हात कोणाचा? छगन भुजबळ यांच्या वॉटसअ‍ॅपवरील डीपीमध्ये पाठीत खंजीर खुपसला जात असल्याचा फोटो ठेवला आहे, याकडे लक्ष वेधले असता खंजीर खुपसणाऱ्याचा चेहरा दिसतो का, दिसत नसला तर खंजीर खुपसणारा हात असा किडकिडा आहे का, असा खोचक सवाल केला.भेद करणाऱ्या देवावर विश्वास नाहीशनि शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना दर्शनासाठी परवानगी देण्याच्या मागणीचे पवार यांनी जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, पुरुष-महिला असा भेद मानणारा देव असेल तर माझ्या लेखी तो देवच नाही. सर्वांसाठी दर्शन खुले करण्याबाबत स्थानिक लोकांशी मी चर्चा केली आहे. आणखीही चर्चा करेल. मुख्यमंत्र्यांनीही सर्वांना दर्शनाची परवानगी असावी सक्तवसुुली संचालनालयाने एकदा नाही, तर तीनवेळा छापे टाकणे, भाजपाच्या एका खासदाराने या कारवाईबाबतचे वेळोवेळी सूतोवाच करणे या घडामोडी बघितल्यानंतर भाजपा सत्तेचा गैरवापर करीत असल्याचे दिसते. कुणाच्या तरी इशाऱ्यावर भुजबळ कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. हे राजकीय द्वेषातून होत असल्याची शंका येते. चौकशी यंत्रणेवर दबाव आणण्याचे प्रयत्न होत आहेत. - शरद पवार