कोल्हापूर : राज्यसेवा मुख्य, वनविभाग आणि उपशिक्षण अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) परीक्षा घेण्यात आल्या. सात ते आठ महिने झाले, तरी अद्यापही या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत.‘एमपीएससी’कडून डिसेंबर २०१३ मध्ये राज्यसेवेची मुख्य परीक्षा तसेच गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी वनविभागातील काही पदे आणि उपशिक्षण अधिकारी पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र, निकालाबाबत कोणतीही माहिती परीक्षा दिलेल्या उमेदवारांना मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, समांतर आरक्षणामुळे कोल्हापूर जिल्ह्णातील काही विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. दरम्यान, दि. २२ नोव्हेंबरला होणाऱ्या साहाय्यक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि दि. २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधि अधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब) आणि विधि अधिकारी, गट-अ आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (पुणे) या परीक्षा तांत्रिक कारणास्तव ‘एमपीएससी’ने पुढे ढकलल्या आहेत. याची नोंद संबंधित परीक्षार्थींनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
तीन परीक्षा पुढे ढकलल्या
By admin | Updated: November 12, 2014 00:27 IST