शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागातील विशिष्ट अधिकाऱ्यांवर ‘पोस्टिंग’ची मेहरनजर

By अतुल कुलकर्णी | Updated: October 11, 2018 01:00 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी शिष्टाई करण्यात पुढाकार घेणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खात्यात सेवाज्येष्ठतेत पुढे असणा-यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाºयांवर मेहरनजर दाखवण्यात आली असून त्यांना महत्वाच्या जागी पोस्टींग मिळाली आहे.

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी शिष्टाई करण्यात पुढाकार घेणा-या जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या खात्यात सेवाज्येष्ठतेत पुढे असणा-यांना डावलून त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाºयांवर मेहरनजर दाखवण्यात आली असून त्यांना महत्वाच्या जागी पोस्टींग मिळाली आहे.कार्यकारी संचालक पदासाठी पात्र असणाºया चार अधिकाºयांपैकी राजेंद्र पानसे व अविनाश सुर्वे या दोनच अधिकाºयांना कार्यकारी पदे मिळाली आहेत. अन्य दोन अधिकाºयांपैकी राजेंद्र पवार यांना गेल्या चार वर्षापासून साईड पोस्टींग दिली गेली आहे. राज्याच्या सेवाज्येष्ठता यादीत चौथ्या नंबरवर असणाºया ह. य. ढंगारे यांना तर तब्बल आठ महिन्यापासून कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. पुढच्या महिन्यात ते निवृत्त होत असल्याने आठ दिवसापूर्वी औरंगाबादच्या वाल्मीत रुजू करुन घेतले गेले. दुसरे अधिकारी सुर्वे यांचे विदर्भ कनेक्शन मजबूत असल्याने त्यांना मात्र मंत्रालयात सचिवपदही आणि विदर्भ पाटबंधारे महामंडळाचा अतिरिक्त कार्यभारही मिळाला आहे.सगळ्यात भाग्यवान ठरले खलील अन्सारी. त्यांचा सध्याचा हुद्दा मुख्य अभियंत्याचा. आता त्यांच्याकडे कोकण प्रदेशाचा मूळ पदभार, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व महाराष्टÑ कृष्णा खोरे विकास महामंडळ असे दोन्हीचे कार्यकारी संचालकपद अशी तीनपदे दिली आहेत. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री महाजन यांचे खाजगी सचिव निशिकांत देशपांडे यांच्याच हाजीअली येथील शासकीय निवासस्थानात त्यांच्याच शेजारी अन्सारींना घरही मिळाले आहे....तरीही विशेष कृपाअन्सारींनी फक्त ६ टक्के उद्दिष्टपूर्ती करूनही त्यांच्यावर विभागाने कृपा केली. ज्यांनी ७० ते ११५ टक्के उद्दिष्ट पूर्ती केली ते मात्र विभागाच्या लेखी बिनकामाचे ठरले आहेत.अशीच मेहरनजर संजय कुलकर्णी यांच्यावर झाली. त्यांच्याकडे तापी प्रदेश जळगावचा मुख्य अभियंत्याचा आणि तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाचाही अतिरिक्त पदभार देण्यात आला तर अजय कोहिरकर यांच्याकडे औरंगाबादचा मुख्य अभियंत्याचा व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकाचाही अति. पदभार आला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र