शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विदर्भात महाबीज संचालक पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 20:33 IST

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदाची निवडणूक जानेवारी महिन्यात होऊ घातली आहे. संचालक पदासाठी विदर्भ मतदारसंघातून विद्यमान संचालक खा. संजय धोत्रे यांनी तसेच उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील वल्लभराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.

ठळक मुद्दे१३ जानेवारीला स्वीकारतील मतपत्रिका२0 जानेवारीला निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदाची निवडणूक जानेवारी महिन्यात होऊ घातली आहे. संचालक पदासाठी विदर्भ मतदारसंघातून विद्यमान संचालक खा. संजय धोत्रे यांनी तसेच उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील वल्लभराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. वल्लभराव देशमुख यांच्या विरोधातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने देशमुख यांची निश्‍चित मानली जात आहे. विदर्भ मतदारसंघातून खा. धोत्रे यांच्याविरोधात एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असून, निवडणुकीसाठी सभासदांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.महाबीजच्या दोन संचालक पदाच्या निवडीसाठी दर तीन वर्षांनी निवडणूक प्रक्रिया पार पडते. त्यासाठी विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदारसंघांचे गठन करण्यात आले आहे. निवडणुकीमध्ये महाबीजच्या कृषक भागधारकांना (सभासद) मतदारसंघानुसार मतदान करावे लागते. विदर्भ मतदारसंघातून महाबीजच्या संचालक पदावर खासदार संजय धोत्रे सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. यावेळी त्यांनी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला असून, खा. धोत्रे यांच्या विरोधात प्रशांत विश्‍वासराव गावंडे यांनी नामांकन अर्ज सादर केला आहे. उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील वल्लभराव तेजराव देशमुख यांनी २00४ पासून विजयाची शृंखला कायम ठेवत यंदासुद्धा उमेदवारी अर्ज सादर केला. देशमुख यांच्या विरोधात आणखी तीन जणांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे देशमुख यांची संचालक पदावर बिनविरोध निवड झाली आहे. विदर्भ मतदारसंघातून संचालक पदासाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून, रीतसर निवड प्रक्रिया पार पडेल. १३ जानेवारी रोजी कृषक भागधारकांकडून मतपत्रिका स्वीकारल्या जाणार असल्याने २३ डिसेंबर रोजी त्यांना घरपोच मतपत्रिका व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. मतपत्रिका स्वीकारल्यानंतर १९ जानेवारीपर्यंत त्यांची छाननी करून अंतिम यादी तयार केली जाणार आहे. २0 जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. 

राज्यात ८ हजार ३२१ सभासदमहाबीजमध्ये राज्यभरातून ८ हजार ३२१ कृषक भागधारकांची (सभासद) नोंद आहे. यामधून १ हजार ८00 भागधारकांचा मृत्यू झाला असून, विदर्भ मतदारसंघात ३ हजार ४६५ भागधारक तर उर्वरित महाराष्ट्रात ३ हजार ५६ भागधारकांचा समावेश असल्याची माहिती आहे. 

२0१४ मध्ये असे झाले मतदान२0१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत एकूण १३ हजार ५३१ मतांपैकी खा. संजय धोत्रे यांना १0 हजार ४७५ मते मिळाली होती. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत गावंडे यांना २ हजार ९७८ तसेच पी.पी. भुयार यांना ५0 मते मिळाली होती. एकूण मतांपैकी २८ मते अवैध ठरली होती. यंदा सलग चौथ्यांदा खासदार धोत्रे रिंगणात आहेत.

सभासदांच्या शेअर्सची संख्या गृहीतमहाबीजमध्ये कृषक सभासदांनी खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या मतांसाठी गृहीत धरल्या जाते. त्यामुळेच सभासदांची संख्या कमी असली, तरी मतांची आकडेवारी वाढलेली दिसून येते. राज्यभरातील सभासदांच्या शेअर्सची संख्या ५२ हजार ११२ असून, त्यामध्ये विदर्भ मतदारसंघाचा वाटा २२ हजार ४११ आहे. 

टॅग्स :MahabeejमहाबीजAkola cityअकोला शहरbuldhanaबुलडाणा