शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोमवार, मंगळवारी मुसळधार वृष्टीची शक्यता

By admin | Updated: July 17, 2017 09:53 IST

गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तब्बल तीन दिवस मनमुराद बरसलेल्या मान्सूनने, रविवारी मात्र विश्रांती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तब्बल तीन दिवस मनमुराद बरसलेल्या मान्सूनने, रविवारी मात्र विश्रांती घेतली. किंचित कुठे तरी बरसलेल्या पावसाच्या एक-दोन सरी वगळता, रविवारी दिवसभर मान्सूनचा शुकशुकाट होता. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पडझडीच्या घटना घडल्या असून, सुदैवाने यात हानी झालेली नाही.मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सकाळी साडेआठच्या नोंदीनुसार, शहरात २४.३५, पूर्व उपनगरात ६९.२१ आणि पश्चिम उपनगरात ४७.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात एक, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी बांधकामांचा भाग पडला. शहरात सहा, पश्चिम उपनगरात एक अशा एकूण सात ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १६, पूर्व उपनगरात १८ आणि पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ५८ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही. दरम्यान, गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी येथील टेकडीवरील माती आणि झाडे उन्मळून, लगतच्या इमारतीच्या संरक्षक भिंतीवर पडली. यात कोणालाही मार लागला नाही. रविवारी असलेल्या काहीशा आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मरिन ड्राइव्ह येथे नेहमीप्रमाणे तरुणाईने गर्दी केल्याचे चित्र होते. रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली, तरी सोमवारसह मंगळवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.