शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंच्या नावे करोडो रुपये उकळणारा पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: May 19, 2017 18:27 IST

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पीए असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणा-याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 19- भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा पीए असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधींचा चुना लावणा-याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. गणेश बोरसे असं या इसमाचं नाव आहे. रावसाहेब दानवे यांना या प्रकराणाची कुणकुण लागली, त्यामुळे दानवेंनीच सापळा रचून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या माणसाने फक्त पैसैच वसूल केले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या नावानं बनावट ऑर्डर काढून लोकांना वितरीतसुद्धा केली आहे. कुणाची बदली करून देणे, अडकलेले सरकारी काम करून देणे, सरकारी नियुक्ती करून देणे, असली कामे करून देतो असल्याचं सांगून गणेश बोरसे लोकांकडून पैसै घेत होता. अगदी अनेक वरिष्ठ सरकारी अधिका-यांकडून सुद्धा त्यानं लाखोंची माया जमा केली. तर अनेकांकडून काम करून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी जमवल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत त्याचे अजूनही काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवती आहे. उद्यापर्यंत या सगळ्या प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचं औरंगाबाद पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या चौकशीतून अनेकांची नाव पुढं येण्याची शक्यता आहे.