शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गरिबांचा कैवारी

By admin | Updated: June 4, 2014 00:04 IST

युतीच्या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतांना त्यांनी ठाणो जिल्ह्यातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम केले. आणीबाणीनंतर जनता पार्टीची राजवट आली,

ठाणो :  युतीच्या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतांना त्यांनी ठाणो जिल्ह्यातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम केले.  आणीबाणीनंतर जनता पार्टीची राजवट आली, तेव्हा 198क् मध्ये ते युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष होते. तेव्हापासून त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. ठाण्याचे सर्व प्रश्न; मग ते आगरी, जंगली, किनारपट्टी विभागातील असोत. त्या सर्व प्रश्नांना मोर्चे, धरणो अशा आंदोलनातून त्यांनी अनेकदा ठाण्यात नेतृत्व केले. जव्हार आणि कल्याण या ठिकाणच्या मोठय़ा मोर्चाचेही त्यांनी नेतृत्व केले होते.  त्यांच्या रूपातून राजकीय आधारवड पक्षाने गमावला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्या उमेदवारीच्या वेळी त्यांना पक्षाने मुरबाडची जबाबदारी सोपवली होती. तेव्हा त्यांनी मुरबाडमध्ये ठाण मांडून पक्षाच्या विजयासाठी विशेष मेहनत घेतली होती.आश्वासक, कणखर तेवढाच सहृदयी आणि संवेदनशील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे ते सर्वाना हवेहवेसे होते,  अशी प्रतिक्रिया संजय केळकर, प्रमुख संघटक, कोकण विभाग, भाजपा यांनी व्यक्त केली. 
198क्मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आदिवासींवर होणा:या अन्यायाविरुद्ध ठाणो जिल्ह्यातील जव्हार येथे मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस कै. अर¨वद पेंडसे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासमवेत मीही त्या मोर्चाचे नेतृत्व केले. सोबत विष्णू सवरा, चिंतामण वणगा हे कार्यकर्तेही होतेच. त्यानंतर जव्हार मोखाडय़ातील आदिवासींचे प्रश्न आणि वावर वांगणीतील बालमृत्यू, तसेच कुपोषणाचे प्रश्न त्यांनी शासनदरबारी लावून धरण्यासाठी या भागात भेटी दिल्या होत्या. त्यांच्यामार्फत तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्यार्पयत माङयासह ठाण्याचे कार्यकर्ते पोहोचलो होतो. वाडय़ाला ते खुपरी येथे माङया गावी आले होते. तिथून नाशिकला गेले होते. त्यांना गरिबांचा कनवळा होता.  माङयासह वणगा या आदिवासी भागातील कार्यकत्र्याबद्दल त्यांना आत्मीयता होती. 
ग्रामीण भाग मग बीडचा असो, की ठाण्याचा त्यांची या भागाशी नाळ जोडलेली होती. त्यांची केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रीपदी निवड झाल्यानंतर ख:या अर्थाने ‘अच्छे दिन आए है’ असे वाटले होते. मात्र ते स्वप्न आता भंगले. त्यांच्या रूपाने गरिबांचा कैवारी हरपला आहे, अशी प्रतिक्रिया ओमप्रकाश शर्मा, सदस्य, राष्ट्रीय परिषद, भाजपा ठाणो यांनी दिली.
 1997 मध्ये ठाणो पालिकेत नगरसेवक झाल्यानंतर माङया जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना मुंडे ठाण्यात रेल्वेमार्गाच्या खाली असलेल्या विटावा पुलाच्या उद्घाटनाला आले होते, असे मिलिंद पाटणकर यांनी सांगितले.
(संकलन : जितेंद्र कालेकर)
 
महायुतीचे शिल्पकार आणि प्रमोद महाजन यांच्यानंतर त्यांची भूमिका बजावणारे असे ते नेते होते. जे महाराष्ट्रासाठी आक्रमक आणि सातत्याने आव्हाने पेलत होते. मुख्य म्हणजे शब्दाला जागणारा नेता आपल्यातून हरपला.
- एकनाथ शिंदे, आमदार, 
शिवसेना ठाणो जिल्हाप्रमुख 
कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेची शेवटच्या टप्प्यातली सभा झाली होती, त्यास मुंडेजी आले होते. तेव्हाच विराट जनसमुदाय बघून खासदार आणि डॉक्टर बनून दिल्लीला यायचे नक्की झाले, बरं का. टेन्शन घ्यायचे नाही, मात्र समाजासाठी दिवसरात्र काम करायचे. वडिलांकडून ते धडे मिळाले असतीलच. असे संभाषण झाले.- डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, 
खासदार, कल्याण लोकसभा
ग्रामीण महाराष्ट्राचा खडान्खडा माहिती असलेले. शरद पवारांनंतर असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्राचे-देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. 
- निरंजन डावखरे, आमदार,
कोकण पदवीधर मतदारसंघ
बहुजनांचा नेता हरपला. महाराष्ट्रातील विविध प्रश्न दिल्लीत नेऊन त्यास वाचा फोडणारे असे ते कणखर नेतृत्व होते.
- प्रकाश भोईर, आमदार, मनसे, कल्याण पश्चिम
जिंदादील नेता. त्यांना प्रथम भेटलो, तेव्हा कोणत्या पक्षाचा आहे, यापेक्षाही माणुसकीच्या नात्याने विचारपूस करत आपलेसे केले. 
- गणपत गायकवाड, अपक्ष आमदार-कल्याण पूर्व
शिवसेना-भाजपा आणि अन्य घटक पक्षांमधील महत्त्वाचा दुवा, गारपिटीच्या समस्येत महाराष्ट्रातील गोरगरिबांना न्याय मिळवून देत त्यांच्यासाठी दिल्लीच्या तख्तावर भांडणारा नेता. 
- रवींद्र चव्हाण, भाजपा आमदार, डोंबिवली
महाराष्ट्राच्या विधानसभेचे राजकारण असो की दिल्लीच्या. एक नाव मात्र महायुती अथवा भाजपा यांच्यातून कायम निश्चित असायचे, ते म्हणजे मुंडे! आधी युती आणि आता महायुतीमधील समन्वयाची भूमिका अत्यंत सूचक-सतर्कतेने ते निभवायचे. कोणालाही न दुखावता सोप्या भाषेत, परंतु मार्मिक संदेश देत मार्गदर्शन करणो हे त्यांचे व्यक्तिमत्त्व.
- राजन विचारे, खासदार - ठाणो लोकसभा
(संकलन : अनिकेत घमंडी)