शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

Video : Pooja Chavan Suicide: 'पूजा अरुण राठोड'च्या गर्भपाताच्या रिपोर्टमुळे चर्चेला उधाण, पण डॉक्टर म्हणतात...

By पूनम अपराज | Updated: February 17, 2021 18:55 IST

Pooja Chavan Suicide: याबाबत वस्तुस्थिती वेगळी असल्याचा खळबळजनक खुलासा खुद्द डॉ. श्रीकांत वराडे यांनी लोकमतशी बोलताना केला आहे.

ठळक मुद्देडॉ. रोहिदास चव्हाण यांच्या देखरेखीखाली त्या महिलेवर उपचार करण्यात आले आणि दुपारी वाजता घरी सोडण्यात आले होते. पूजा अरुण राठोड या महिलेबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही डॉ. रोहिदास चव्हाण यांना संपर्क साधू शकता असे देखील ते पुढे म्हणाले. 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर येते आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पूजा अरूण राठोड नावाची महिला ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक ३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे  यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसतं आहे. मात्र, याबाबत वस्तुस्थिती वेगळी असल्याचा खळबळजनक खुलासा खुद्द डॉ. श्रीकांत वराडे यांनी लोकमतशी बोलताना केला आहे.

डॉ. रोहिदास चव्हाण यांच्या देखरेखीखाली त्या महिलेवर उपचार करण्यात आले आणि दुपारी वाजता घरी सोडण्यात आले होते. डॉ. श्रीकांत वराडे यांनी लोकमतला अधिक माहिती देताना सांगितले की, पूजा अरुण राठोड (२२) या महिलेला मी पाहिलं देखील नाही. मात्र, मी ५ फेब्रुवारीला युनिट २ साठी म्हणजेच सकाळी ९ ते दुसऱ्यादिवशी (६ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजेपर्यंत कार्यरत होते. दरम्यान, माझं युनिट सुरु असताना युनिट १ चे डॉ. रोहिदास चव्हाण यांनी पहाटे ४.३४ वाजता संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं आणि तिला सखी या कक्षात डॉ. चव्हाण यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. डॉ. चव्हाण यांचं युनिट १ हे  ६ फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या (७ फेब्रुवारी) सकाळी ९ पर्यंत सुरु होते. त्यामुळे या महिलेच्या उपचारही माझा तसूभरही संबंध नसल्याचे डॉ. वराडे यांनी सांगितले. पूजा अरुण राठोड या महिलेबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही डॉ. रोहिदास चव्हाण यांना संपर्क साधू शकता असे देखील ते पुढे म्हणाले. 

 

 

डॉ. रोहिदास चव्हाण ६ दिवसाच्या रजेवर होते

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात OBGY विभागाचे (म्हणजेच जेथे पूजा अरुण राठोड या महिलेवर उपचार करण्यात आले) प्रमुख डॉ. रोहिदास चव्हाण हे गेले सहा दिवस आई आजारी असल्याचे कारण सांगून रजेवर गेले होते. काल १६ फेब्रुवारीला ते हजर राहणार होते. मात्र ते हजर झाले की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. याबाबत त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागला. 

 

व्हायरल झालेल्या शॉर्ट केस रिपोर्टमध्ये नेमकं काय ?

शॉर्ट केस रिपोर्टमध्ये रुग्णाचे नाव पूजा अरुण राठोड (२२) असून तिच्यावर जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत उपचार करण्यात आले. पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी तिला युनिट २ मध्ये वॉर्ड क्रमांक ३ मध्ये दाखल करून घेण्यात आले. या रिपोर्टवर युनिट २ चे प्रमुख म्हणून डॉ. श्रीकांत वराडे यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय गर्भपात करण्यात आल्याचं देखील त्यात नमूद करण्यात आलं आहे. 

मध्यरात्री ‘एचएमआयएस’ कक्ष उघडण्यामागील रहस्य काय?वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपचारार्थ दाखल रुग्णांची नोंद एचएमआयएस (हाॅस्पिटल मॅनेजमेंट इंटीग्रेटेड सिस्टीम) प्रणालीवर घेतली जाते. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा संदर्भ येताच येथेही हालचाली सुरू झाल्या होत्या. शनिवारी मध्यरात्रीनंतर एचएमआयएस कक्ष उघडण्यात आला होता. इतक्या रात्री हा कक्ष उघडण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे.  त्याबाबत तेथील यंत्रणेत वेगवेगळे अंदाज वर्तविले जात असून कक्ष उघडण्याच्या घटनेकडे साशंकतेने पाहिले जात आहे.  कक्ष उघडण्याचा हा प्रकार पुणे ग्रामीण पोलिसांसाठी तपासाचा धागा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणdoctorडॉक्टरYavatmalयवतमाळpregnant womanगर्भवती महिला